शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

विठ्ठलाच्या गाभा-यात वासा कोसळला

By admin | Updated: January 14, 2015 03:54 IST

कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाच्या गाभाऱ्यात लाकडी वासा मखरावर कोसळला.

पंढरपूर : कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाच्या गाभाऱ्यात लाकडी वासा मखरावर कोसळला. मखरामुळे मूर्ती वाचली आणि शेजारी उभ्या असलेल्या ज्ञानेश मुंगसे या पुजाऱ्याच्या पाठीवर हा वासा पडला. ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठल मूर्तीच्या बरोबर डोक्यावर मंदिराचा कळस आहे. कळसाच्या मध्यभागी दोन-दोन फुटांचे चार वासे लावले आहेत. त्यापैकी एक वासा मंगळवारी रात्री कोसळला. विठ्ठल मूर्तीच्या सभोवताली चांदीचे मखर आणि डोक्यावर छत्री केली असल्याने कळसातून थेट विठ्ठल मूर्तीच्या डोक्यावर पडणारा वासा छत्रीवर पडला. त्याचे दोन-तीन तुकडे झाले आणि मखराच्या शेजारी उभ्या असलेल्या ज्ञानेश मुंगसे यांच्या पाठीवर पडले. त्यात ते किरकोळ जखमी झाले.दोन दिवसांवर संक्रातीचा सण असल्याने विठ्ठल-रुक्मिणी चे दर्शन घेण्यासाठी आजपासूनच भाविकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे रात्री नऊच्या सुमारासही सुमारे तीनशे भाविक मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्याच वेळी ही घटना घडल्याने काही वेळ मंदिरात खळबळ उडाली आणि दर्शन रांग थांबविण्यात आली. त्यानंतर तातडीने मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी तुटलेला वासा बाजूला काढला व पुन्हा दर्शन सुरळीत सुरु झाले. मात्र या घटनेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत होती. त्यामुळे बाहेर उभ्या असणाऱ्या सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनाही या गोष्टीची कोणतीच खबर नव्हती. (प्रतिनिधी)