शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

वैद्यकीय प्रवेशाची घडी ‘नीट’ बसेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 05:20 IST

डोमिसाईल घोटाळा आणि त्यानंतर खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेतून घेतलेली माघार यामुळे विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली आहे.

मुंबई : डोमिसाईल घोटाळा आणि त्यानंतर खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेतून घेतलेली माघार यामुळे विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली आहे. या महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेतून माघार घेतल्याने दीड ते दोन हजार जागा कमी झाल्या आहेत. एकंदरच वैद्यकीय प्रवेशाची घडी ‘नीट’ बसत नसल्याचे चित्र आहे. या सर्व गदारोळात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने गुरुवारी मध्यरात्री वैद्यकीय प्रक्रियेची पहिली यादी दोन दिवस उशिरा जाहीर केली आहे. पहिल्या यादीत २ हजार ६७४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.देशपातळीवर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशात सुसूत्रता आणण्यासाठी ‘नीट’ परीक्षा घेण्यात आली. त्यातही गोंधळ उडाला होता. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ५ हजार जागा असल्याने अन्य राज्यातील विद्यार्थ्यांनी खोटी डोमिसाईल सर्टिफिकेट देऊन महाराष्ट्रातून अर्ज भरले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर यादीमधून तब्बल ७६७ विद्यार्थ्यांची नावे काढून टाकण्यात आली होती. तसेच प्रवेशाची पहिली यादी दोन दिवस पुढे ढकलण्यात आली.त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री दोन दिवस उशिराने जाहीर झालेल्या यादीमुळे पालक, विद्यार्थ्यांची चिंता मिटण्याऐवजी ती आणखीनच वाढली आहे. कारण पहिल्या यादीत २ हजार ६७४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले असले तरी हे प्रवेश फक्त शासकीय आणि महापालिका वैद्यकीय महाविद्यालयातच देण्यात आले आहेत. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे यात नावच नाही. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेतून माघार घेतल्यामुळे प्रवेशाच्या दीड ते दोन हजार जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे संतप्त पालकांनी शुक्रवारी सकाळपासून संचालनालयाच्या कार्यालयात गर्दी केली होती. दुसरीकडे खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना शुल्क नियंत्रण समितीने दिलेल्या शुल्कावर प्रवेश देणे शक्य नसल्याचे महाविद्यालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.विनाअनुदानित खासगी वैद्यकीय महाविद्यालयांशी रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. खासगी महाविद्यालयांचा प्रश्न शनिवारपर्यंत सुटेल, तेदेखील प्रक्रियेत सहभागी होतील. विद्यार्थ्यांनी चिंता करू नये, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.सरकारने लक्ष घालावेराज्यातील विद्यार्थ्यांसाठी ८५ टक्के जागा राखीव आहेत. पण, खासगी महाविद्यालयांनी प्रवेश नाकारल्यास राज्यातील विद्यार्थ्यांना अडचणी येणार आहेत. सातत्याने प्रवेश प्रक्रियेत होत असणाºया गोंधळामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागल्याने सरकारने यात लक्ष घालावे,अशी मागणी विद्यार्थी आणि पालक करत आहेत.