शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पुन्हा एकदा ‘उडान’चा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 06:15 IST

१३ फेब्रुवारीपासून होणार सुरुवात : राज्यांतर्गत विमानसेवेसाठी स्पाइस जेट, टर्बाे मेगाची निवड

- गौरीशंकर घाळे 

मुंबई : महानगरांपलिकडे विमानसेवेचा विस्तार करण्याच्या उद्देशाने राज्यात पुन्हा ‘उडान’चा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यानुसार १३ फेब्रुवारीपासून नाशिक, जळगाव, कोल्हापूर आणि सोलापूर ही शहरे पुन्हा विमानसेवेने मुंबईशी जोडण्यात येणार आहेत. याशिवाय, नाशिक-पुणे दरम्यान विमानसेवा सुरू होणार आहे. त्यासाठी स्पाइस जेट आणि टर्बाे मेगा या दोन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.

राज्यातील विविध जिल्हे विमानसेवेने जोडण्याचा यापूर्वी करण्यात आलेला प्रयत्न फसला होता. एअर डेक्कन कंपनीला ‘उडान’ प्रकल्पांतर्गत विमानसेवा देण्यात अपयश आले. त्यामुळे आता एअर डेक्कनच्या जागी स्पाइस जेट आणि टर्बाे मेगा या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. पुढील महिन्यांत १३ फेब्रुवारीपासून नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे, जळगाव-मुंबई, कोल्हापूर-मुंबई आणि सोलापूर-मुंबई या पाच मार्गांवर पुन्हा विमानसेवेला सुरुवात होणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

पहिल्या टप्प्यातील विमानसेवा यशस्वी झाल्यानंतर दुसºया टप्प्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून अन्य राज्यात विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी १९ मार्गांना मंजुरी देण्यात आल्याचे संबंधित अधिकाºयांनी स्पष्ट केले. जळगाव-अहमदाबाद, कोल्हापूर-बंगळुरू, कोल्हापूर-हैदराबाद, कोल्हापूर-तिरूपती, नाशिक-अहमदाबाद, नाशिक-बेंगलोर, नाशिक-भोपाळ, नाशिक-गोवा, नाशिक-इंडन, नाशिक-हैदराबाद, सोलापूर-बंगळुरू, सोलापूर-हैदराबाद, मुंबई-दरभंगा, मुंबई-कन्नूर, मुंबई-अलाहाबाद, नागपूर-अलाहाबाद, पुणे-अलाहाबाद, पुणे-हुबळी या मार्गांवर विमानसेवा सुरू केली जाईल. १५ जूनपासून नाशिक-दिल्ली दरम्यान विमानसेवा सुरू होणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.काय आहे ‘उडान’ प्रकल्पछोटी शहरे विमानसेवेने जोडण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ‘उडान’ ही योजना जाहीर केली. ‘उडान’ प्रकल्पांतर्गत नवीन शहरात विमानसेवा देणाºया कंपनीला प्रत्येक फेरीतील ५० टक्के आसने सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावी लागतात. प्रवाशांअभावी आसने रिक्त राहिल्यास केंद्र आणि राज्य सरकारांकडून अनुदान स्वरूपात विमान कंपनीचा तोटा भरून काढला जातो. देशांतर्गत विमानसेवा मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती आणि गोंदिया येथील विमानतळांचा विकास करण्यात आला आहे.

टॅग्स :airplaneविमान