शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘डी गँग’कडून ‘आरटीआय’चा वापर, आणखी १५ ते २० गुन्हे दाखल होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 04:56 IST

मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील बड्या बांधकाम व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळण्यासाठी सामान्य माणसाच्या फायद्यासाठी सुरू केलेल्या माहिती अधिकाराचा (आरटीआय) वापर कुख्यात मोस्ट वाण्टेड डॉन दाऊद इब्राहीम टोळीने केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

मनीषा म्हात्रे मुंबई : मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील बड्या बांधकाम व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळण्यासाठी सामान्य माणसाच्या फायद्यासाठी सुरू केलेल्या माहिती अधिकाराचा (आरटीआय) वापर कुख्यात मोस्ट वाण्टेड डॉन दाऊद इब्राहीम टोळीने केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याच आरटीआयच्या माध्यमातून बड्या व्यावसायिकांची माहिती काढून त्यांना धमकाविण्याचे काम ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या मुमताज खानकडे इक्बालने सोपविले होते. कासकरविरुद्ध तक्रारदार पुढे येत असून आणखीन १५ ते २० गुन्हे त्याच्यावर दाखल होण्याची शक्यता आहे.कराचीमध्ये बसून जगभरातील ‘डी गँग’चा कारभार दाऊद चालवतो. त्याची बहीण हसिना पारकर मुंबईच्या पाकमोडिया स्ट्रीटच्या इमारतीत बसून कारभार पाहायची. पारकरच्या मृत्यूनंतर सर्व सूत्रे इक्बालच्या हाती आली. हसिनाने तयार केलेली यंत्रणा विश्वासू साथीदारांच्या मदतीने इक्बाल हे काम बघू लागला. यासाठी इक्बालने जवळच्या साप्ताहिकात काम करणाºया मुमताजच्या मदतीने माहिती काढायचा. नागपाडा परिसरात राहणारा मुमताज हा साप्ताहिकात पत्रकार म्हणून काम करायचा. तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही त्याचा वावर होता. मुमताजच्या अटकेनंतरआणखीन एक साथीदार अफजल अली खान उर्फ अफजल पाणीवाला हैद्राबादला कुटुंबियांसोबत रवाना झाला. दोघांच्याही घराबाहेर दीडशे ते तीनशे मीटर अंतरापर्यंत सीसीटीव्हीचे कुंपण आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ४७ हून अधिक गुन्हे आहेत. त्याची कासकरसोबत उठबस होती. त्याचाही शोध पोलीस घेत आहेत. नुकताच हैद्राबादमध्ये अल्पवयीन मुलींशी विवाह प्रकरणी कारवाईत पाणीवाल्याच्या सासºयालाही अटक करण्यात आली होती. पाणीवाला हा माहिती अधिकारातून व्यावसायिकांची माहिती मिळवायचा. त्यानंतर मुमताज संबंधित व्यक्तींकडे कासकरमार्फत प्रस्ताव ठेवत होता. त्यानंतर ही प्रकरणे इक्बालला येऊन सांगायचा.मुमताज पुढे प्रस्ताव मांडायचा. यामध्ये त्याला काही नगरसेवक, बडे नेते आणि शासकीय कार्यालयातील कर्मचारीही माहिती पुरवत होते. इक्बाल त्यांना कराचीमधून भाईचा फोन येईल असे धमकावायचा. अशारितीने त्याचा खंडणीचा व्यवसाय सुरू होता.कासकरच्या अटकेनंतर मुंबईतील काही जण गायब झाले आहेत. शुक्रवारी मुंबईतून आणखीन एका संशयितालाचौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यामुळे याप्रकरणात आणखी बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.>प्रदीप शर्मा यांची नियुक्ती नियोजनपूर्वकभाजप सरकारने छोटा राजनला भारतात आणून दाऊद विरोधातील आपली भूमिका याआधीच स्पष्ट केली होती. त्यानंतर दाऊदचे मुंबईतील साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी काही अधिकाºयांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. त्यात मंत्री बनलेल्या आयपीएस अधिकाºयाचा मोठा वाटा आहे. तसेच ज्यावेळी हे अधिकारी गजाआड गेले होते. त्यावेळी अंडरवर्ल्डमधून कोणीही त्यांच्या मदतीला धावले नाही. याचाच फायदा उठवून अंडरवर्ल्ड आणि मुख्यत्वेकरून दाऊदच्या साम्राज्याला संपवण्यासाठी या हालचाली असल्याची चर्चा सुरू झाली. याचाच भाग म्हणून एनकाऊण्टर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची नेमणूक ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकात करण्यात आली.आधी त्यांनी दाऊदच्या मुंबईतील साम्राज्यास सुरुंग लावण्यासाठी माहिती काढण्यास सुरुवात केली. इक्बाल कासकर याची प्रसिध्दी माध्यमांसमोर आलेली अटक तेवढी साधी नव्हती. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्याविरुद्ध फास आवळण्यात आला होता. त्यातूनच पुढे आलेल्या तक्रारदाराच्या मदतीने सुरुवातीला मुमताज आणि इसरारच्या चौकशीतून इक्बालभोवती अटकेचा फास आवळला.हैद्राबादमध्ये अफजल पाणीवाला हा माहिती अधिकारातून व्यावसायिकांची माहिती मिळवायचा. त्यानंतर मुमताज संबंधित व्यक्तींकडे कासकरमार्फत प्रस्ताव ठेवत होता. त्यानंतर ही प्रकरणे इक्बालला येऊन सांगायचा.