शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात साडेआठशे एकरवर सेंद्रिय शेतीचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2016 19:56 IST

कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे (आत्मा) च्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यात ८५० एकर शेतीवर सेंद्रिय शेतीचा प्रयोग राबविला जात आहे. जिल्ह्यातील

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 22 -  कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे (आत्मा) च्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यात ८५० एकर शेतीवर सेंद्रिय शेतीचा प्रयोग राबविला जात आहे. जिल्ह्यातील विविध भागांतील १७ शेतकरी गटांनी पुढे येऊन सेंद्रिय शेतीची नोंदणी केली आहे. या शेतीवर कोणतेही रासायनिक खत किंवा कीटकनाशक न वापरता पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने खरिपाचे पीक घेण्यात येत आहे.केंद्र सरकारने सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आत्माला प्रत्येक जिल्ह्यात सेंद्रिय शेती करणारे गट स्थापन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २४ शेतकरी गटांचे उद्दिष्ट आहे. खरीप हंगामात त्याला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १७ शेतकरी गट स्थापन होऊन त्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती सुरू केली आहे. गंगापूर तालुक्यात कासोडा, खुलताबाद तालुक्यात वेरूळ, कन्नड तालुक्यात वाकद, आडगाव, कविटखेडा, सोयगाव तालुक्यात जरंडी, औरंगाबाद तालुक्यात पळशी आदी ठिकाणी हे गट स्थापन झाले आहेत. प्रत्येक गटात पन्नास शेतकरी असून, त्या सर्वांनी आत्मा कार्यालयात सेंद्रिय शेतीची नोंदणी केली आहे. आता खरिपाचे पीक निघाल्यानंतर आत्माकडून या शेतकऱ्यांना सेंद्रिय पिकांचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच त्यांचे उत्पादन विक्री करण्यासाठीही कृषी विभागाकडून मदत केली जाणार आहे. शेतीत रासायनिक खत किंवा कीटकनाशकाचा वापर करणार नसल्याची हमी शेतकऱ्यांनी दिली आहे. त्याऐवजी या शेतकऱ्यांना गांडूळ खत, जैविक खते वापराविषयीचे प्रशिक्षण कृषी विभागाकडून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील या साडेआठशे एकर शेतजमिनीवर प्रामुख्याने तूर, मूग, उडीद, हरभरा यासारख्या कडधान्यांची पेरणी करण्यात आलेली आहे. तर काही ठिकाणी सेंद्रिय पद्धतीने फळभाज्यांची लागवड झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १७ गट स्थापन झाले असून, आणखी ७ गटांची स्थापना केली जाणार आहे.

सेंद्रिय शेतीचे फायदे...उत्पादन खर्चात बचत.जमिनीचा पोत सुधारण्यास मदत. उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा.सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या मालाला अधिक भाव.शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती अधिक फायद्याची आहे. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या मालाची विक्री करण्यासाठी त्यांना कृषी विभागाकडून मदत केली जाणार आहे.- सतीश शिरडकर, उपसंचालक, आत्मा