शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

बहुउद्देशीय सहकारी संस्थांचा शक्तिप्रदर्शनासाठी वापर

By admin | Updated: August 26, 2016 01:19 IST

शक्तिप्रदर्शनासाठी करण्याचा प्रकार सध्या तालुक्यातील प्रमुख राजकीय पक्ष करत असल्याचे चित्र आहे.

इंदापूर : बहुउद्देशीय सहकारी संस्थांचा उद्देश जरी वेगळा असला, तरी त्याचा वापर आपल्या शक्तिप्रदर्शनासाठी करण्याचा प्रकार सध्या तालुक्यातील प्रमुख राजकीय पक्ष करत असल्याचे चित्र आहे. बँकेचे शाखाप्रमुख, या संस्थांचे खाते उघडण्यासाठी गेलेल्या पदाधिकाऱ्यांचा अर्ज व सहायक निबंधकांचा आदेश स्वीकारत नाहीत, या कारणावरून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विभागीय व्यवस्थापकांना घेराव घालण्याचा जो प्रकार काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी गेल्या सोमवारी केला, तो ‘आगामी’ शक्तिप्रदर्शनाआड कोणी येऊ नये म्हणून केलेल्या शक्तिप्रदर्शनाचाच एक भाग होता. सहकारी संस्थांच्या उपनिबंधक कार्यालयाने या वर्षी जून महिन्यात बँकांमध्ये बहुउद्देशीय संस्थांची खाती उघडण्यास परवानगी द्यावी, असा आदेश दिला. त्यानुसार तालुक्यातील सुमारे ७५० संस्थांना बँकेत खाती उघडण्यास परवानगी देण्यात आली. या बहुउद्देशीय सहकारी संस्थांचे निकष तयार नाहीत. नोंदणीबाबत अनिश्चितता आहे. खाती उघडण्यास कसलीही कालमर्यादा नाही. मात्र, खाती उघडण्यास परवानगी देण्यात आलेल्या संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा वरचष्मा आहे. या संस्थांचे ज्या वेळी मतात रूपांतर होईल त्या वेळी आपण मागे पडायला नको, या एकमेव विचाराने काँग्रेस कार्यकर्त्यांनी २१७ संस्था निर्माण केल्या. सहायक निबंधक कार्यालयात त्यांची नोंदणीही केली. सहायक निबंधकांचा आदेश व आपले पत्र घेऊन या संस्थांचे मुख्य प्रवर्तक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तालुक्यातील वेगवेगळ्या शाखांमध्ये गेले. मात्र, शाखाप्रमुखांनी त्यांचे अर्ज व निबंधकांचा आदेश स्वीकारला नाही. या संस्थादेखील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेप्रमाणेच शेती प्रयोजनासाठी सहकार कायद्याप्रमाणे स्थापन झालेल्या संस्थांना सभासद करून घेणे व कर्जपुरवठा करणे हे काम करणार आहेत. असे असताना खाते उघडण्यास परवानगी न देऊन सहकार कायद्याची पायमल्ली बँकेचे अधिकारी करत आहेत, अशी हरकत घेऊन कृष्णाजी यादव, मंगेश पाटील, विलासराव वाघमोडे, मयूरसिंह पाटील, महादेव घाडगे या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सोमवारी सकाळी जिल्हा बँकेच्या इंदापूर शाखेवर हल्लाबोल केला. बँकेचे विभागीय व्यवस्थापक शिंदे यांना बँकेच्या सभागृहात बोलावून त्यांना घेराव घातला. खाते उघडण्यास परवानगी द्या अथवा आम्ही केलेल्या तक्रारी अर्जावर पोहोच द्या, नाहीतर बँकेच्या बाहेर रस्त्यावर ठिय्या मांडून निषेध सभाच घेतो, असा पवित्रा त्यांनी घेतला. आरोपांबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी तो फेटाळून लावला. विरोधकांना आपल्या साखर कारखान्यांचे सभासद करून घेण्याची ज्यांची इच्छाशक्ती नाही, त्यांना स्वत:च्या डोळ्यांतले मुसळ दिसणार नाही, मात्र दुसऱ्यांच्या डोळ्यांत ‘नसलेले’ कुसळ दिसणारच ना, असा टोला त्यांनी मारला.