शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

पाकिस्तान दौऱ्यासाठी अमेरिकी एजन्सीचे पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2016 02:13 IST

अमेरिकेच्या ड्रग एन्फोर्समेंट आॅथॉरिटीने आपल्याला पाकिस्तान दौऱ्यासाठी पैसे दिल्याची माहिती या हल्ल्यातील माफीचा साक्षीदार बनलेला अमेरिकन नागरिक डेव्हिड हेडलीने बुधवारी

मुंबई : अमेरिकेच्या ड्रग एन्फोर्समेंट आॅथॉरिटीने आपल्याला पाकिस्तान दौऱ्यासाठी पैसे दिल्याची माहिती या हल्ल्यातील माफीचा साक्षीदार बनलेला अमेरिकन नागरिक डेव्हिड हेडलीने बुधवारी उलटतपासणी दरम्यान विशेष न्यायालयाला दिली. मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याच्या दोन वर्षे आधी म्हणजेच २००६ पर्यंत मी लष्कर-ए-तोयबाला सुमारे ७० लाख रुपये देणगी म्हणून दिल्याचेही हेडलीने विशेष न्यायालयाला सांगितले.अमेरिकेतील तुरुंगात असलेल्या ५५ वर्षीय हेडलीची गेल्या महिन्यात मुंबईतील विशेष न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष नोंदविण्यात आली. २६/११च्या हल्ल्याप्रकरणी हेडलीला अमेरिकेच्या न्यायालयाने ३५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. मुंबईत सुरू असलेल्या खटल्यातील आरोपी अबू जुंदाल याचे वकील वहाब खान यांनी बुधवारपासून हेडलीची उलटतपासणी घेण्यास सुरुवात केली.हेडलीला १९९८मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तानला भेट देण्यासाठी अमेरिकेच्या ड्रग एन्फोर्समेंट अ‍ॅथॉरिटीने (डीईए) एकदा पैसे पुरवले होते. मी डीईएच्या संपर्कात होतो. मात्र १९८८ ते १९९८ दरम्यान मी डीईएला माहिती पुरवत होतो किंवा त्यांना सहाय्य करत होतो, या आरोपात तथ्य नाही, असे हेडलीने उलटतपासणीवेळी सांगितले.हेडलीच्या साक्षीच्या विश्वासार्हतेवर अ‍ॅड. वहाब खान यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. ‘भूतकाळात दोनदा कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या हेडलीने अमरिकेबरोबर केलेल्या कराराचे उल्लंघन केले आहे. हेडलीला १९८८ आणि १९९८ मध्ये ड्रग स्मगलिंग केसमध्ये अमेरिकेत अटक करण्यात आली होती. दोन्ही वेळा हेडलीने अमेरिकेबरोबर पुन्हा गुन्हा करणार नाही, अशा आशयाचा करार अमेरिका सरकारबरोबर केला. तरीही तो मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी झाला. अमेरिकेने त्याला गांभीर्याने न घेता सहजच सोडून दिले,’ असा युक्तिवाद अ‍ॅड. वहाब खान यांनी विशेष न्यायालयाचे न्या. जी. ए. सानप यांच्यापुढे केला.मी कोणत्याही गुन्ह्यात सहभागी व्हायचे नाही, अशी एक अट करारात घालण्यात आली होती. पाकिस्तानमध्ये जाऊन लष्करच्या संपर्कात राहून मी या कराराचे उल्लंघन केले. १९८८मध्ये ठोठावलेली चार वर्षांची शिक्षा पूर्ण केल्यानंतर मी १९९२ ते १९९८ मध्ये ड्रग स्मगलिंगमध्ये उतरलो. त्यासाठी मी अनेक वेळा पाकिस्तानला गेलो, असेही हेडलीने उलटतपासणीच्या वेळी सांगितले.हेडलीने लष्करकडून पैसे घेतले का, अशी वारंवार विचारणा केल्यावर हेडली संतापला. ‘मी वारंवार सांगितले की, मी एलईटीकडून पैसे घेतले नाही. तुम्हाला (वहाब खान) या भाषेमध्ये सांगितलेले समजत नसेल तर मी उर्दूमध्ये सांगतो,’ असे हेडलीने म्हटले. त्याच्या या उत्तरावर खान हसले. त्यांचे हसणे पाहून हेडलीने संतापत म्हटले की, तुमच्या अशिलाची (अबु जुंदाल) केस या साक्षीवर अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही गंभीर असायला हवे...जोक करू नका.हेडली एलईटीचा आॅपरेटीव्ह असल्याची माहिती डॉ. राणाला होती.मूळचा पाकिस्तानचा आणि हेडलीचा सहकारी डॉ. तहव्वूर राणाला हेडली लष्कर-ए-तोयबाचा आॅपरेटीव्ह असल्याची माहिती होती, खुद्द हेडलीने विशेष न्यायालयासमोर मान्य केले. मी एलईटीसाठी काम करत आहे, यावर राणाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे राणाने मला मुंबईतील त्याचे कार्यालय सोडण्यास सांगितले. मी त्याची आज्ञा पाळून जुलै २००८ मध्ये कार्यालय बंद करण्यासाठी पावले उचलली. २६/११ च्या हल्ल्यापूर्वी राणाने मुंबईला भेट दिली होती. त्यानंतर हल्ला होईपर्यंत तो माझ्याबरोबर होता, असेही हेडलीने स्पष्ट केले.डेन्मार्क कटात (मिकी माऊस) राणा माझ्याबरोबर सहभागी नव्हता, मीच या कटात होतो. राणा मला यात अधेमधे मदत करत असे. मात्र ती मदत छोट्या स्वरूपाची होती, असेही हेडलीने सांगितले.