शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
5
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
6
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
7
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
8
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
9
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
10
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
11
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
12
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
13
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
14
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
15
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
17
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
18
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
20
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!

उर्से खिंडीत कोसळली दरड

By admin | Updated: July 4, 2016 02:10 IST

पहिल्याच पावसात उर्से खिंडीत रविवारी सकाळी दरड कोसळली

उर्से : पहिल्याच पावसात उर्से खिंडीत रविवारी सकाळी दरड कोसळली. त्यामुळे पुन्हा एकदा येथील वाहनचालकांच्या सुरक्षितेतचा प्रश्न उभ राहीला आहे. खिंडीत वारंवार दरडी कोसळत असूनही कुठलीच उपाययोजना करण्यात येत नसल्याने अपघाताचा धोका कायम आहे. आयआरबीच्या व रस्ते विकास महामंडळाच्या दुर्लक्षपणामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. उर्से खिंड पंचक्रोशीतील गावांसाठी वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. खिंडीजवळच द्रुतगती महामार्ग झाल्याने खिंडीतून वाहतूक वाढली. त्यामुळे १५ वर्षांपूवी या खिंडीचा विस्तार करण्यात आला. खिंडीत दर वर्षी पावसाळ्यात दरड कोसळत असतात. सुरक्षिततेच्या उपाययोजना होत नसल्याने या खिंडीतून जाताना जीव मुठीत घेऊन वाहनचालकांना जावे लागत आहे. मात्र, अनेक वेळा निवेदन देऊनही याकडे का लक्ष दिले जात नाही? बेजबाबदार व ढिसाळ कामाला जबाबदार आयआरबी, रस्ते विकास महामंडळ पदाधिकारी का कामगार? असा सवाल परिसरातील नागरिक करीत आहेत. खिंडीजवळच आयआरबीचे कार्यालय आहे . वाहनचालक अगोदरच येथून जाताना दरड कोसळण्याच्या भीतीने जात असतो. मात्र, या बाजूच्या दरडीमुळे गाडी घसरण्याची व अपघात होण्याची शाश्वती वाढली आहे. घटनेनंतर लगेचच रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन दरड हलवण्याचे आदेश दिले. येथील प्रवास सुरक्षित करण्यासाठी आयआरबी व रस्ते विकास महामंडळाने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करताना माजी सरपंच साहेबराव कारके यांनी केली. अनेक वेळा निवेदन देणारे सुभाष धामणकर यांनीदेखील दरड कोसळल्याबाबत कुठलीच दक्षता घेण्यात येत नसल्याने संताप व्यक्त केला.कुसगाव, डोंगरगावची जलवाहिनी तुटलीलोणावळा : पाणी योजनेची जलवाहिनी नांगरगाव तेथे इंद्रायणी पात्रात तुटल्याने कुसगाव डोंगरगावसह इतर वाड्या-वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. वलवण धरणावरून नांगरगावमार्गे कुसगाव व परिसरातील गावांसाठी या योजनेची जलवाहिनी नेण्यात आली आहे. ती नांगरगाव येथून नदीपात्रातून गेली आहे. दोन दिवसांपासून लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने इंद्रायणीचे पाणी वाढले आहे. पाण्याचा वेग व जलपर्णी यामुळे ही पाइपलाइन तुटल्याचे नागरिक सांगत आहेत. यामुळे गावांचा पाणीपुरवठा किमान आठ दिवस बंद राहणार असल्याने ऐन पावसात या गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवणार आहे.