शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सर्वपक्षीय महिला आमदारांचा मुख्यमंत्र्यांना आग्रह

By admin | Updated: December 10, 2015 02:59 IST

अधिवेशनाचे कामकाज होत नाही, निदान बाकी सार्वजनिक कामे तरी करून घ्यावीत अशी चर्चा सर्वपक्षीय महिला आमदारांनी केली आणि राज्य महिला आयोगावर तातडीने कुणाची तरी नेमणूक करा

अधिवेशनाचे कामकाज होत नाही, निदान बाकी सार्वजनिक कामे तरी करून घ्यावीत अशी चर्चा सर्वपक्षीय महिला आमदारांनी केली आणि राज्य महिला आयोगावर तातडीने कुणाची तरी नेमणूक करा, असा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरण्याचा निर्णय झाला. लगेच निवेदन तयार केले गेले, सौ. वर्षा गायकवाड, सौ. मंदाताई म्हात्रे, सौ. अनिता अशोक चव्हाण, श्रीमती सुमनताई पाटील यांच्यासह सर्वपक्षीय महिला आमदारांचा मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या दालनात येऊन धडकला. तेथे काही पत्रकार बसलेले पाहून मंदाताई आणि वर्षा गायकवाड यांच्यात लटकी जुगलबंदीही झाली. वर्षाताई म्हणाल्या, तातडीने आयोगावर नेमणूक केलीच पाहिजे, त्यावर मंदाताई म्हणाल्या, तुमचे सरकार होते तेव्हा का नाही केली. आता आम्ही नक्की करणार आहोत. घाई करू नका... आर.आर. पाटील यांच्या पत्नी सौ. सुमनताई ही तेथे होत्या. त्यांना नेमके काय बोलायचे हे माहीत नसल्याने त्या बुजल्यासारख्या दिसत होत्या. त्यांना वर्षातार्इंनी पुढे आणून बसवले तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अनिता चव्हाण शेवटपर्यंत उभ्याच होत्या. मुख्यमंत्री फडणवीस आले, आणि सगळ्यांनी त्यांना निवेदन दिले. लवकरच नेमणूक करतो, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यावर लवकरच म्हणजे कधी, असा सवाल वर्षातार्इंनी केला. तेव्हा लवकर म्हणजे लवकरात लवकर... असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले आणि सगळ्या महिला मंडळात हंशा पिकला... शिष्टमंडळाचे काम झाल्यानंतर मंदातार्इंनी नवी मुंबईने स्मार्ट सिटीतून अंग काढून घेतल्याची तक्रार करून टाकली...खडसे आणि गुलाबराव एकत्रमहसूलमंत्री एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांचे तसे फारसे सख्य नाही. दोघेही जाहीरपणे एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र आज दोघे एकत्र आले तेही मुख्यमंत्र्यांच्या अ‍ॅन्टी चेंबरमध्ये. निमित्त होते, जळगावच्या केळ्यांना न्याय देण्याचे. शालेय पोषण आहारात केळी देणे सक्तीचे करा, असा आग्रह धरत जळगाव जिल्ह्यातील सगळे आमदार एकत्र आले. गणितज्ज्ञ भास्कराचार्य यांनी पाटणादेवी येथे शून्याचा शोध लावला तर जागतिक दर्जाचे चित्रकार, शिल्पकार केकी मुस चाळीसगावचे. या दोघांचे स्मारक व्हावे, असा आग्रहही जळगावकर आमदारांनी धरला. शून्याचा शोध जर परदेशात लागला असता तर ते जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र झाले असते, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी या कामात लक्ष घालण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. आता आम्ही माध्यमांना काय सांगायचे असेही काहींनी विचारले तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, अधिवेशन संपण्याच्या आत निर्णय घेऊ... या निमित्ताने काही काळ का होईना, गुलाबराव आणि खडसे एकत्र आले. मुख्यमंत्र्यांच्या अ‍ॅन्टी चेंबरला दोन दरवाजे. दोघे दोन दरवाजाने आत आले आणि वेगळ्या दरवाजाने गेले... कोण म्हणतो, अधिवेशनात काम नाही...हिवाळी अधिवेशनात काही काम होताना दिसत नाही. प्रत्येकाच्या सोयीने विषय हाताळले जात आहेत. मात्र ज्यांना येथे थांबण्याशिवाय पर्याय नाही त्यांना मात्र भरपूर कामे लागली आहेत... सकाळी गुलाबी थंडीत लवकर उठून पायी फिरायला जाणे, रोज सकाळी उद्या नक्की जीमला जायचे असा निर्णय घेणे, त्यानंतर नागपुरातील खाण्याचे अड्डे शोधून तेथे ब्रेकफास्ट करणे, विधानभवनात आल्यानंतर नागपुरी संत्र्यांचा ज्यूस पिणे, दुपारी कुणी ना कुणी आणलेले सावजीचे जेवण घेणे, सायंकाळी पुन्हा एकदा ज्यूसचा राऊंड घेत घेत रात्रीचे ‘नियोजन’ करणे यातच त्यांचा दिवस कधी संपतोय हे कळेनासे झाले आहे... उगाच नागपूरबाहेर राहणाऱ्यांना वाटते की नागपुरात असे काय काम असते... गैरसमज दूर व्हावा म्हणून हे सांगायला नको का...४ अतुल कुलकर्णी