शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘संपुआ’ सरकारने केले होते ४ ‘सर्जिकल स्ट्राईक’ - शरद पवारांचा गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2016 20:36 IST

माझ्या कार्यकाळात 4 वेळा सर्जिकल स्ट्राइक झालं होतं, मात्र आम्ही त्याचा कधीही गवगवा केला नाही

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि.06 -  ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या मुद्द्यावरुन देशातील राजकारण तापायला सुरुवात झाली असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ‘बॉम्बगोळा’ टाकला आहे. मोदी सरकारने उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी टाकलेल्या पावलाचे आम्ही स्वागतच करतो. मात्र त्याचा गवगवा करणे योग्य नाही. ‘संपुआ’ सरकारच्या काळात सैन्याने ४ वेळा पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन हल्ले केले होते. परंतु त्याचा गवगवा करण्यात आला नव्हता, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले. नागपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

उरी येथे सैन्यदलाच्या छावणीवर झालेल्या हल्ल्याने देशवासीयांचे मन हेलावून गेले. सर्वांनाच चीड आली होती व आता बदला घेतलाच पाहिजे ही देशाची भावना होती. एरवी केंद्र शासनाच्या विविध बाबींवर मी टीका करतो. परंतु दहशतवाद्यांची शिबीरे उध्वस्त करण्यासाठी पाकव्याप्त काश्मिरमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे स्वागतच करतो. मात्र अशा संकटांना तोंड द्यायचे असते. कारवाई केल्यानंतर गवगवा करण्याची बाब खटकली आहे. देशाला एकसंघ ठेवणे ही राज्यकर्त्यांची पहिली जबाबदारी आहे, असे पवार म्हणाले. 
 
देशाने एक व्हायला हवे
 
देशाच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर राजकारण व्हायला नको. निवडणूका येतात आणि जातात. परंतु देशाची सीमा अखंड आणि सुरक्षित रहायला हवी. देशावर संकट येत असेल तर संपूर्ण देशाने एकत्र व्हायला हवे. या मुद्द्यावर आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत व कधीही राजकारण आणणार नाही, असे शरद पवार म्हणाले.