शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

युपीत मराठी; भाजपच्या अपयशाची कबुली, कृपाशंकर सिंहांच्या पत्रावर काॅंग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 12:25 IST

सिंह यांनी नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहून उत्तर प्रदेशातील शालेय शिक्षणात मराठी पर्यायी भाषा म्हणून शिकवावी, अशी मागणी केली. या पत्रावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.

मुंबई : रोजगाराच्या दृष्टीने उत्तर प्रदेशातील शालेय शिक्षणात मराठीचा समावेश करण्याची भाजप नेते कृपाशंकर सिंह यांची मागणी म्हणजे भाजपच्या अपयशाची कबुली आहे. योगी आदित्यनाथ यांचे सरकार रोजगार निर्मितीत अपयशी ठरले आहे. त्यामुळे रोजगाराचा स्रोत म्हणून उत्तर प्रदेश हा महाराष्ट्रावर अवलंबून आहे. त्याची कबुली सिंह यांच्या पत्राने दिल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. 

सिंह यांनी नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहून उत्तर प्रदेशातील शालेय शिक्षणात मराठी पर्यायी भाषा म्हणून शिकवावी, अशी मागणी केली. या पत्रावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्याने मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांचे लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्नात भाजपने स्वतःला उघडे तर पाडलेच पण उत्तर प्रदेशमधील स्वतःच्या सरकारची अक्षमता देखील उघड केली आहे. तर महाराष्ट्राने स्थलांतरितांना वाईट वागणूक दिल्याचा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला होता. प्रत्यक्षात त्यांच्याच सरकारने वाईट वागणूक दिल्याचे जगाने पाहिले, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

काय आहे पत्रात? सिंग यांनी अलीकडेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवून उत्तर प्रदेशातील शालेय शिक्षणात वैकल्पिक विषय म्हणून मराठीचा समावेश करण्याची मागणी केली. मी महाराष्ट्रात ५० वर्षांपासून राहतो. रोजगाराच्या शोधात तरुण महाराष्ट्रात येतात. मात्र, मराठी भाषेचे ज्ञान नसल्याने त्यांना अनेक रोजगाराच्या संधींपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे युपीतील शालेय शिक्षणात मराठीचा पर्याय द्यावा. जेणेकरून इथल्या राज्य सरकार व महामंडळे, पालिकांमधील रोजगाराच्या संधी मिळू शकतील, अशी मागणी कृपाशंकर यांनी केली होती.

टॅग्स :Kripashankar Singhकृपाशंकर सिंगSachin sawantसचिन सावंत