शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बेभरवशाच्या पावसाने खरीप क्षेत्र जैसे थे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 23:31 IST

दर दोन-तीन वर्षांनंतर पाऊसमान बदलत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील खरीप पेरणीचे क्षेत्रही कमी-अधिक होत असून, मागील वर्षी एक लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.

सोलापूर : दर दोन-तीन वर्षांनंतर पाऊसमान बदलत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील खरीप पेरणीचे क्षेत्रही कमी-अधिक होत असून, मागील वर्षी एक लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. तूर, उडीद, मका याशिवाय अलीकडे मराठवाड्याच्या लगतच्या क्षेत्रात सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रातवाढ होत असली, तरी खरिपाच्या क्षेत्रात फार असा बदल होत नाही.सोलापूर जिल्हा हा प्रामुख्याने रब्बी जिल्हा म्हणून ओळखला जातो. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभऱ्याच्या पेरणीशिवाय ऊस लागवडही मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या क्षेत्रात आजही खरीप पेरणीवर शेतकरी भर देतात. यामध्ये अक्कलकोट, बार्शी, सांगोला, मंगळवेढा, करमाळा या तालुक्यात प्रामुख्याने खरीप पेरणी होते. सोलापूर जिल्ह्याचे खरीप पेरणीचे सरासरी क्षेत्र ७९ हजार १७ हेक्टर इतके आहे. जून-जुलै महिन्यात पाऊस जसा पडेल, त्या प्रमाणात खरीप पेरणीचे क्षेत्र कमी-अधिक होते. मागील वर्षी जून महिन्यात चांगला पाऊस पडल्याने प्रत्यक्षात एक लाख ७ हजार ६७४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. या वर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याच्या काही भागांत चांगला पाऊस पडला असला, तरी अनेक भागात अद्यापही पेरणीस उपयुक्त पाऊस झालेला नाही.ज्या भागात जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागातही नंतर पाऊस लांबणार असल्याचे अंदाज सांगितल्याने पेरणी करण्यास शेतकरी धाडस करत नाहीय. जिल्ह्यातील शेतकरी जूनमध्ये चांगला पाऊस पडला, तर उडीद, मूग, जुलै महिन्यात चांगला पाऊस पडला, तर तूर व सोयाबीनवर भर देतो.