पांढरकवडा (यवतमाळ) : लग्नाची पत्रिका घेऊन आलेल्या एका नऊ वर्षीय बालिकेवर बांगडी विक्रेत्याने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना पांढरकवडा तालुक्यातील रुंझा येथे गुरुवारी घडली. याप्रकरणी रात्री पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.शेख सत्तार शेख मिया (५१, रा. रुंझा) असे आरोपीचे नाव असून तो परिसरात बांगडी विक्रीचा व्यवसाय करतो. या बालिकेला तिच्या वडिलांनी लग्नाची पत्रिका देऊन शेख सत्तारच्या घरी पाठविले होते. बराच वेळ झाला, तरी ती परत न आल्याने वडिलांनी तिचा शोध घेतला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.वडील तिला घेऊन थेट रुंझा येथील पोलीस आऊटपोस्टमध्ये पोहोचले. मात्र त्या ठिकाणी कुणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांनी पांढरकवडा गाठून या घटनेची तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी शेख सत्तारविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. रात्री पोलिसांनी किन्ही नंदापूर येथे सापळा रचून त्याला अटक केली.
यवतमाळमध्ये बालिकेवर अनैसर्गिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 01:24 IST