शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी होईपर्यंत ‘संघर्ष’ सुरूच!

By admin | Updated: April 7, 2017 05:24 IST

कृषी अर्थव्यवस्था कोलमडली तर महाराष्ट्र कोलमडेल. शेतकरी दुष्काळाच्या छायेत असताना पूर्ण कर्जमाफीशिवाय पर्याय नाही.

कऱ्हाड (जि. सातारा) : ‘कृषी अर्थव्यवस्था कोलमडली तर महाराष्ट्र कोलमडेल. शेतकरी दुष्काळाच्या छायेत असताना पूर्ण कर्जमाफीशिवाय पर्याय नाही. कर्जमाफीची घोषणा होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या घोषणेसाठी मुहूर्त न शोधता त्वरित घोषणा करावी,’ अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.कऱ्हाड येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘राज्यात फडणवीस सरकार आल्यापासून सुमारे नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, ते स्पष्ट होते. आम्ही विरोधी पक्षात असल्याने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी लावून धरली. पण १९ आमदारांना निलंबित करण्याचे पाप सरकारने केले. तमिळनाडू व उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना काही अटी, शर्ती घालून कर्जमाफी केली. पण महाराष्ट्रात आम्हाला कोणत्याही अटी-शर्तीशिवाय संपूर्ण कर्जमाफी हवी आहे; आणि ती झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.’’सभागृहामध्ये कितीही मुद्दे मांडले तरी हे सरकार त्याला दाद देत नाही. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्ही सर्व विरोधकांनी चांदा ते बांदापर्यंत संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच सर्व विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र आले असून, संघर्ष यात्रेचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये उत्तर महाराष्ट्रात ही संघर्ष यात्रा काढली जाणार आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>...तर मी त्यांना पहिला हार घालेनसुरुवातीला कर्जमाफीला विरोध करणारे मुख्यमंत्री आता योग्यवेळी कर्जमाफीचा निर्णय घेईन, असे सांगतात. परंतु त्यांची ही योग्य वेळ अजून किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर येणार आहे? शेतकऱ्यांचा अंत न पाहता त्यांनी जर संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेतला तर मी पहिल्यांदा त्यांना हार घालून अभिनंदन करेन. - आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री