शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक स्टडी रिपोर्ट
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
6
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
7
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
8
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
9
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
10
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
11
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
12
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
13
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
14
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
15
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
16
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
17
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
18
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
19
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
20
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?

भग्नावस्थेत हरवतेय हडसरचे वेगळेपण

By admin | Updated: May 4, 2017 00:00 IST

जुन्नर तालुक्यातील हडसर ऊर्फ पर्वतगड हा एक महत्त्वाचा किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून उंची साधारण ४६८७ फूट आणि कोरीव

अशोक खरात / खोडदजुन्नर तालुक्यातील हडसर ऊर्फ पर्वतगड हा एक महत्त्वाचा किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून उंची साधारण ४६८७ फूट आणि कोरीव प्रवेशद्वारांनी आपले वेगळेपण जपणारा किल्ला आहे. शहाजी सागर (माणिकडोह धरण) ओलांडून पुढे जाऊन हडसर गाव लागते. जुन्नर ते हडसर हे अंतर साधारण १६-१७ किमी आहे. जुन्नरमधील एकूण किल्ल्यांच्या यादीतील हडसर किल्ल्याच्या अभेद्य कोरीव वाटा हे वैशिष्ट्यच मानले जाते.किल्ले पठारावरील खोदीव धान्य कोठारे, कातळाच्या पोटात लपलेले कोरीव पायरीमार्ग, जीर्ण गडदेवीचे मंदिर आणि एक शिवमंदिर, पूर्वेकडील खिळ्याची वाट असे बांधकाम शैलीचे स्वत:चे वैशिष्ट्य जपणारा किल्ले हडसर इतिहासाविषयी खूपच अबोल आहे. कोरीव दरवाजे, पायऱ्या आणि धान्य कोठार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. बालेकिल्ल्यावरीलएक छोटेखानी तळ्याच्या बाजुने आपण पुढे गेल्यानंतर एक जुने जाणते शंभुचे मंदिर दिसते. मंदिराच्या पूर्वेला खूप सारे दगडी चौथरे इथल्या मानवी वस्तीचा पुरावाच देत आहेत. पायवाटेने थोडेसे उत्तरेकडे गेलो असता भग्नावस्थेत असलेले पण अवशेषांवरून पूर्वीच्या भव्यतेची कल्पना यावी, असे बऱ्यापैकी मोठे देवीचे मंदिर आहे. देवी मंदिराच्या पूर्वेकडे अशाच अवस्थेतील मारुतीचे मंदिर आहे. एक तुटलेल्या अवस्थेत असलेली तटबंदीची भिंत आणि बाजुने खाली उतरणारी पाऊल वाट खिळ्यांच्या वाटेकडे जाते. हडसर किल्ल्याच्या पठारावरील पूर्व भागातील एकंदरच बांधकामाचे अवशेष बघता, मंदिराची भव्यता बघता इथे तत्कालीन वेळी राजघराण्यातील महत्वाच्या व्यक्तींचे वास्तव्य असावे, असे वाटते. हडसर किल्ल्यावरील उर्वरित अवशेष बघता, इथे इतिहास फारसा बोलत नाही, असं दिसतं. उपलब्ध डोंगर कपार आणि खडकाचा खूप प्रभावीपणे केलेला वापर हीच हडसरची खासियात म्हणावी लागेल. इथे बांधकाम करण्याऐवजी डोंगर कोरून पायरी मार्ग, धान्य कोठारे इ बनविण्यात आली आहेत. पश्चिमेकडील बाजुने डोंगर पोटात लपलेली राजवाटने पुढे बालेकिल्ल्यावर घेऊन येते.