वाशिम, दि. २२- शहरातील उच्चभ्रू वसाहतीतील गणेश उर्फ पवन जगदीश मंत्री या १९ वर्षीय युवकाने चार वर्षीय निरागस बालकावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना दि.२0 रोजी घडली. याप्रकरणी पीडित बालकाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बुधवारी आरोपीस ताब्यात घेतले. दरम्यान, माणूसकीला काळीमा फासणार्या या घटनेमुळे परिसरातील संतप्त नागरीकांनी पोलीस स्टेशन गाठून रोष व्यक्त केला. शहरातील आययुडीपी वसाहतीमध्ये सायंकाळी पाच वर्षे वय असलेला निरागस मुलगा घरासमोर खेळत होता.यावेळी शेजारी भाड्याच्या खोलीत राहत असलेल्या गणेश उर्फ पवन जगदीश मंत्री याने बाळाला खेळण्यासाठी खोलीत नेले. या नराधमाने बाळासोबत अनैसर्गिक कृत्य करुन अत्याचार केला. सदर प्रकार पीडित मुलाच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिने तातडीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.
पाच वर्षीय बालकावर अनैसर्गिक अत्याचार
By admin | Updated: March 23, 2017 02:20 IST