शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसन होत नाही तोपर्यंत विरोध कायम, नवी मुंबई विमानतळबाधितांची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 03:11 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पनवेलमधील दहा गावे स्थलांतरित केली जाणार आहेत. मात्र या गावातील तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या शिवक्रांती मावळा संघटनेचा सिडकोच्या भूमिकेला विरोध आहे.

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पनवेलमधील दहा गावे स्थलांतरित केली जाणार आहेत. मात्र या गावातील तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या शिवक्रांती मावळा संघटनेचा सिडकोच्या भूमिकेला विरोध आहे. जोपर्यंतच्या शेवटच्या घराचे पुनर्वसन होत नाही, तसेच येथील स्थानिक दहा गावांच्या प्रकल्पग्रस्तांच्या १७ मागण्या सिडको प्रशासन मान्य करीत नाहीत तोपर्यंत आमचे गाव खाली करणार नसल्याने सिडको प्रशासनासमोर या गावातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आव्हान असणार आहे.शिवक्रांती मावळा प्रकल्पग्रस्त संघटनेचे खजिनदार रूपेश धुमाळ म्हणाले, आम्ही ही दहा गावे कोणत्याही परिस्थितीत स्थलांतरित होऊ देणार नाहीत. या गावांच्या विविध मागण्यांसाठी तरु ण अनेक वर्षे लढा देत आहेत. पत्रव्यवहार करून कोकण आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामध्ये व्यावसायिक पुनर्वसन, मासेमारी, कुक्कुटपालन, पशुपालन, रेती व्यवसाय, खडी या सर्व व्यवसायांचे जिल्हाधिकाºयांनी सर्व्हे करून संबंधितांना प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र देणे, तसेच सिडकोमार्फत त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. विमानतळ क्षेत्रात सिडको खासगी एजन्सीमार्फत काम करते ते बेकायदेशीर असून ग्रामसेवक, तलाठी या सरकारी यंत्रणांमार्फत ही कामे होणे गरजेचे आहे. तसेच २०१३ च्या नव्या कायद्यानुसार हे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना सेवाकर, प्रॉपर्टी टॅक्स, मुद्रांक शुल्क व इतर फीमधून सूट देण्यात यावी, सिडकोने इमारतीच्या बांधकामासाठी ५००९ चौ. फूट एवढा दर द्यावा, दहा गावांचे शासनाने कोणत्याही प्रकारे लीज स्वरूपात भाड्याने न देता कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, बारा बलुतेदार, दगडखाण कामगार, आदिवासी, अनुसूचित जाती, तसेच सर्व प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त दाखले देऊन त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात यावे आदी १७ मागण्या प्रकल्पग्रस्तांच्या आहेत.

टॅग्स :Airportविमानतळ