शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठाकडून पुन्हा एकदा 'तारीख पे तारीख'; निकालासाठी 19 सप्टेंबरचा नवा वायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 16:56 IST

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देमुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. विद्यापीठाने दिलेल्या सगळ्या तारखा उलटूनही अजून बऱ्याचं विभागांचे निकाल न लागल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.मुंबई विद्यापीठाकडून आता निकालासाठी एका नव्या तारखेचा वायदा करण्यात आला आहे.

मुंबई, दि. 6- मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. विद्यापीठाने दिलेल्या सगळ्या तारखा उलटूनही अजून बऱ्याचं विभागांचे निकाल न लागल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. अशातच मुंबई विद्यापीठाकडून आता निकालासाठी एका नव्या तारखेचा वायदा करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाने निकालासाठी 19 सप्टेंबर ही नवी तारीख दिली आहे. गणेशोत्सव, ईदमुळे निकालासाठी उशिर झाल्याचा अजब दावा मुंबई विद्यापीठाने बुधवारी मुंबई हायकोर्टात केला आहे. दरम्यान, निकालाची डेडलाईन लेखी स्वरूपात देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने विद्यापीठाला दिले आहेत. विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या या नव्या तारखेमुळे निकालासाठी विद्यार्थ्यांना आता 19 सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

मुंबई विद्यापीठात अजूनही उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झालेली नाही. विद्यापीठाला अजूनही १४ निकाल जाहीर करायचे आहेत. ४७७ निकालांपैकी विद्यापीठाने आतापर्यंत ४६३ निकाल जाहीर केले आहेत. पण या निकालांमध्ये गोंधळ झाले आहेत. अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत, काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. तसंच वाणिज्य शाखेचा निकाल लागल्यानंतर मोठा गोंधळ झाला होता. संकेतस्थळ बंद पडल्याने अनेक विद्यार्थी त्रस्त झाले होते. 

उत्तरपत्रिकांची तपासणी संपणार कधी? विद्यार्थ्यांचे निकालाकडे लागले डोळेमुंबई विद्यापीठाच्या निकाल प्रक्रियेला अजूनही वेग प्राप्त झालेला नाही. सप्टेंबर महिना उजाडूनही तब्बल ५० हजार उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे, तर अजूनही विद्यापीठाला २० हून अधिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करायचे आहेत. त्यामुळे आता उत्तरपत्रिकांची तपासणी विद्यापीठ कधी पूर्ण करणार, असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत.निकालाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर, निकाल जाहीर करता येतो, पण इथे अद्याप उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण होत नसल्याने, उर्वरित निकाल विद्यापीठ कधी जाहीर करणार? याकडे विद्यार्थ्यांचे डोळे लागून राहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा मे महिन्यात झाल्या. परीक्षा संपून तीन महिने संपूनही निकाल न लागल्याने, विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.

तक्रारींचे निवारण ऑनलाइन, विद्यार्थ्यांसाठी नवीन संकेतस्थळ सुरूऑनलाइन तपासणीमुळे लागलेल्या निकालात गोंधळ झाला आहे. या विद्यार्थ्यांच्या शंकांचं निराकरण आता मुंबई विद्यापीठ ऑनलाइन पद्धतीनेच करणार आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारी निवारणासाठी विद्यापीठाने नवीन संकेतस्थळ सुरू केली आहेत. मुंबई विद्यापीठात अजूनही उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झालेली नाही. विद्यापीठाला अजूनही १४ निकाल जाहीर करायचे आहेत. ४७७ निकालांपैकी विद्यापीठाने आतापर्यंत ४६३ निकाल जाहीर केले आहेत. पण या निकालांमध्ये गोंधळ झाले आहेत. अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत, काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अथवा नोकरीसाठी योग्य निकाल मिळावा म्हणून विद्यार्थी कालिना कॅम्पसमधील परीक्षा भवनाच्या पायऱ्या झिजवत आहेत. विद्यार्थ्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून विद्यापीठाने नवीन संकेतस्थळ सुरू केले आहे.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठ