शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचे परिपत्रक : अनुपस्थित विद्यार्थ्यांची ६ जानेवारीला विशेष परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 04:34 IST

महाराष्ट्र बंदमध्ये बुधवारी, ३ जानेवारीला परीक्षेला अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची ६ जानेवारीला विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने गुरूवारी जाहीर केला आहे. बंददरम्यान झालेल्या रास्ता रोको आणि रेल रोकोमुळे बहुतेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहचता आले नव्हते.

मुंबई - महाराष्ट्र बंदमध्ये बुधवारी, ३ जानेवारीला परीक्षेला अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची ६ जानेवारीला विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने गुरूवारी जाहीर केला आहे. बंददरम्यान झालेल्या रास्ता रोको आणि रेल रोकोमुळे बहुतेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहचता आले नव्हते. अशा विद्यार्थ्यांसाठी हीविशेष परीक्षा होणार असून परीक्षेची वेळ आणि ठिकाण यामध्ये कोणताही बदल केलेला नसल्याचे परिपत्रक विद्यापीठाने निर्गमित केले आहे.संबंधित परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क उपकुलसचिव लीलाधर बन्सोड यांनी दिली. ३ जानेवारीला सकाळच्या सत्रात ४ परीक्षा, तर दुपारच्या सत्रात ९ अशा एकुण १३ परीक्षांचे आयोजन केले होते. ज्यामध्ये सकाळच्या सत्रात तृतीय वर्ष बीकॉम (आयडॉल), एमएस्सी फॉरेन्सिक सायन्स (सत्र १), एमएस्सी पार्ट-२ आणि एमसीए (आयडॉल) सत्र-२ या परीक्षांचे आयोजन केले होते.दुपारच्या सत्रात म्हणजेच ३ वाजता सुरू होणाºया परीक्षांमध्ये तृतीय वर्ष बीए (वार्षिक), एमएड (स्पेशल एज्युकेशन) (हीअरिंग इम्पेअरड) सत्र-१, एम.ए. पार्ट-१, पार्ट-२ (वार्षिक), बीकॉम सत्र-६, एम.कॉम (पार्ट-एक) वार्षिक, तृतीय वर्ष बीएस्सी (वार्षिक) (आयडॉल), बीएस्सी (आयटी) सत्र-पाच, एमसीए (सत्र-४) (आयडॉल) आणि द्वितीय एलएलबी/सामान्य एलएलबी(सत्र-३) (तीन वर्षीय अभ्यासक्रम) चतुर्थ वर्ष एलएलबी( पाच वर्षीय अभ्यासक्रम) (सत्र -७) या परीक्षांचा समावेश होता.वाहतुकीच्या व अन्य कारणांमुळे या परीक्षांना ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचता आले नाही, अशा विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी देण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले होते. त्या अनुषंगाने विद्यापीठाने अशा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत या परीक्षा आता ६ जानेवारीला घेण्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे या परीक्षांच्या वेळेत आणि ठिकाणांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.वाहतुकीच्या व अन्य कारणांमुळे या परीक्षांना ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचता आले नाही, अशा विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी देण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले होते. त्या अनुषंगाने विद्यापीठाने अशा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत या परीक्षा आता ६ जानेवारीला घेण्याचे जाहीर केले आहे.

टॅग्स :examपरीक्षाMumbaiमुंबई