शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

'नवाब मलिक दुसऱ्यांच्या शर्ट- पँट पाहण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 15:45 IST

मुंबई: एनसीबी(NCB)चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यात मागील काही दिवसांपासून ...

मुंबई: एनसीबी(NCB)चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यात मागील काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र पाहाया मिळत आहे. मलिक यांनी वानखेडेंवर हजारो-लाखो रुपयांच्या वस्तु वापरतात,कपडे घालतात असा अरोप केला आहे. त्यावरुन आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नवाब मलिकांवर निशाणा साधलाय.

तुमचं बाहेर काढल्यावर अवघड होईल...आज नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांचीही खरडपट्टी घेतली. नवाब मलिक लोकांचे शर्ट-पँट पाहण्यासाठी दुसऱ्यांच्या बेडरुममध्ये जातातच कशाला? ही चांगली सवय नाही, असा सणसणाटी टोला राणेंनी मलिक यांना लगावला. तसेच, कोण कितीचं काय वापरतंय, याचं मलिकांना काय कराचयंय, त्यांचं त्यांनी पाहावं. तुमचं काही बाहेर काढलं तर अवघड होईल, असा इशाराही नारायण राणेंनी मलिकांना दिला.

'संजय राऊत सरकलाय'यावेळी पत्रकार परिषदेत राणेंनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. राणे म्हणाले की, संजय राऊतांचे अग्रलेख वाचत होतो, कलाबेन डेलकर निवडून आल्यावर आम्हाला मोठं यश आलं, आम्ही दिल्ली काबीज करणार, असा दावा राऊत करत आहेत. रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने राऊतांना भान राहत नाही वाटतं. आम्ही 303 पेक्षा अधिक आहे, तुम्ही एकने धडक मारणार ? संजय राऊत सरकलेला माणुस आहे. दिल्लीला धडक मारायला आल्यावर जागेवर डोकं राहणार नाही. आता तुमचे 56 आमदार आहेत, ते मोदींमुळेच निवडून आलेत. युती केली आणि नंतर गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं, असंही राणे यावेळी म्हणाले.

राणेंनी हेडिंगच वाचून दाखवल्यानारायण राणेंनी शुक्रवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत शरद पवार यांचे कौतुक करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. यावेळी राणेंनी शरद पवार आणि काँग्रेसच्या विरोधात शिवसेनेने दिलेल्या हेडिंगच वाचून दाखवल्या. काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे अधू मेंदूचे लोक आहेत. प्रत्येक ठिकाणी सिंचनाचे प्रकल्प तुमच्या दिवट्याने कसे अर्धवट टाकले हे पाहा, अशा हेडिंग सामनाने दिल्या होत्या. आज मात्र ते पवार आणि काँग्रेसचे गुणगाण गात आहेत, असा चिमटा त्यांनी काढला. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे nawab malikनवाब मलिकSameer Wankhedeसमीर वानखेडे