शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

केंद्रीय मंत्रिमंडळात अडसूळ यांचा समावेश?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2015 03:02 IST

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून खासदार आनंदराव अडसूळ यांची वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भातील स्पष्ट संकेत सहकार व पणनमंत्री

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून खासदार आनंदराव अडसूळ यांची वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भातील स्पष्ट संकेत सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. आगामी मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या नात्याचा यासाठी प्रसंगी वापर आपण करू, अशी ग्वाहीच चंद्रकांत पाटील यांनी या वेळी दिली.राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या को-आॅपरेटिव्ह बँक एम्प्लॉइज युनियन या संघटनेच्या ५५व्या वर्धापन सोहळ्यात त्यांनी हे संकेत दिले. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात शनिवारी हा सोहळा पार पडला. को-आॅपरेटिव्ह बँक एम्प्लॉइज युनियनचे गेली ३० वर्षे समर्थपणे धुरा सांभाळून सहकार चळवळीलाही हातभार लावल्याबद्दल आनंदराव अडसूळ यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय बने, युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी आनंदराव अडसूळ म्हणाले, सहकार क्षेत्रावर आधीच प्राप्तिकराचा बोजा लादला गेला आहे. आता सभासदांवर टीडीएस कापले जाण्याचा जाच यंदाच्या अर्थसंकल्पाने लादला आहे. प्राप्तिकर आणि यंदाच्या अर्थसंकल्पातील टीडीएस वसुलीच्या मुद्द्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे आग्रह धरू, असे चंद्रकांत पाटील यांनी या वेळेस बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)