शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक मायनिंग लीजसाठी अनुत्सुक

By admin | Updated: January 30, 2016 01:14 IST

कोळसा मंत्रालयाने गेल्या वर्षी २९ खाणी लिलावात दिल्या असल्या तरी त्यापैकी फक्त सात खाणींमध्ये आजपर्यंत कोळसा उत्पादन सुरू झाले आहे व २२ खाणींचे उत्पादन प्रलंबित आहे; अशी स्पष्ट कबुली

- सोपान पांढरीपांडे,  नागपूरकोळसा मंत्रालयाने गेल्या वर्षी २९ खाणी लिलावात दिल्या असल्या तरी त्यापैकी फक्त सात खाणींमध्ये आजपर्यंत कोळसा उत्पादन सुरू झाले आहे व २२ खाणींचे उत्पादन प्रलंबित आहे; अशी स्पष्ट कबुली कोळसा मंत्रालयाने लोकमतला दिलेल्या उत्तरात दिली आहे.उत्पादन सुरू झालेल्या खाणी १) तालाबिरा-क, २) सारिसाटोली, ३) बेलगाव, ४) मंडला-उत्तर, ५) अमेलिया- उत्तर, ६) चोथुआ ७) गरे पाल्मा-कश्(4) या खाणींमध्ये कोळसा उत्पादन सुरू झाले असल्याची माहिती कोळसा मंत्रालयाने दिली.उत्पादन प्रलंबित असलेल्या खाणीज्या २२ खाणींमधून अजून उत्पादन सुरू झालेले नाही त्यांची नावे पुढीलप्रमाणे- १) सियाल-घोघरी (मध्य प्रदेश) २) कठौतिया (झारखंड), ३) मरकी-मांगली-ककक (महाराष्ट्र), ४) ट्रान्स-दामोदर (पश्चिम बंगाल), ५) अर्धग्राम (पश्चिम बंगाल), ६) टोकीसुद-उत्तर (झारखंड), ७) गरे पाल्मा-कश्(5) (छत्तीसगड), ८) बिचारपूर (मध्य प्रदेश), ९) गरे पाल्मा-कश्(7) (छत्तीसगड), १०) जितपूर (झारखंड), ११) बिंद्रा (झारखंड), १२) सासल (झारखंड), १३) मोईत्रा (झारखंड), १४) मंदाकिनी (ओडिशा), १५) मेरल (झारखंड), १६) नरेड-मालेगाव (महाराष्ट्र), १७) डुमरी (झारखंड), १८) गणेशपूर (झारखंड), १९) मंडला-दक्षिण (मध्य प्रदेश), २०) गरे पाल्मा- कश् (8) (छत्तीसगड), २१) उत्कल-सी (ओडिशा) व २२) लोहारी (झारखंड).याचबरोबर किती खाणींचा लिलाव रद्द झाला आहे व उत्पादनातील विलंबाचे कारण काय, या प्रश्नांना उत्तरे देताना मंत्रालयाने एका खाणीचा लिलाव रद्द झाला असून उत्पादनातील विलंबासाठी विशिष्ट असे कारण नाही असे म्हटले आहे.वस्तुस्थिती काय आहे?- लोकमतने केलेल्या चौकशीत कोळसा खाणी घेतलेल्या उद्योजकांपैकी बहुसंख्य उद्योजक खाणींचा ताबा घेण्यासाठी किंवा मायनिंग लीज घेण्यासाठी अनुत्सुक असल्याचे समोर आले आहे.- याचे एकमेव कारण म्हणजे खाणींचा लिलाव करण्यासाठी सरकारला गेल्या वर्षी माईन्स अ‍ॅण्ड मिनरल्स (रेग्युलेशन) अ‍ॅक्टमध्ये सुधारणा करावी लागली होती. ही सुधारणा करताना सरकारने मायनिंग लीजसाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी तब्बल १०० पटीने वाढविली होती. ही अवाढव्य स्टॅम्प ड्युटी भरणे उद्योजकांना परवडणारे नाही त्यामुळे उद्योजक खाणींचा ताबा घेण्यासाठी किंवा मायनिंग लीज घेण्यासाठी अनुत्सुक आहेत. विश्वसनीय सूत्रांनुसार या अतिप्रचंड स्टॅम्प ड्युटीमुळे लोढा उद्योग समूहाच्या क्रेस्ट स्टील अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेडने त्यांना मिळालेल्या कोळसा खाणीचा लिलावच रद्द केला आहे. या कंपनीने स्पर्धात्मक लिलावात छत्तीसगडमधील भास्करपारा कोळसा खाण आॅगस्ट-२०१५ मध्ये घेतली होती. पण स्टॅम्प ड्युटीच्या दडपणामुळे कंपनीने दोनच महिन्यांत म्हणजे आॅक्टोबर-२०१५ मध्ये हा लिलाव रद्द केला.एवढेच नव्हे तर, उद्योजकांचा कोळसा खाणी घेण्याबद्दलचा अनुत्साह बघून सरकारने दुसऱ्या टप्प्यातील खाणींचा लिलावच सुरू केलेला नाही, अशीही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.