शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

माझ्याविरोधात नाहक षड्यंत्र

By admin | Updated: May 21, 2017 01:43 IST

जुहू येथील एस्टेला रेस्टॉरंटच्या संबंधित व्यक्तींनी माझ्याविरोधात खोटेनाटे आरोप करून माझी बदनामी केली आहे. या रेस्टॉरंटमध्ये गेलेल्या व्यक्तींशी माझा

- लोकमत न्यूज नेटवर्क

कणकवली (जि.सिंधुदुर्ग) : जुहू येथील एस्टेला रेस्टॉरंटच्या संबंधित व्यक्तींनी माझ्याविरोधात खोटेनाटे आरोप करून माझी बदनामी केली आहे. या रेस्टॉरंटमध्ये गेलेल्या व्यक्तींशी माझा कोणताही संबंध नाही. त्याचप्रमाणे तेथे कोणत्याही प्रकारची तोडफोड झालेली नाही. पोलीस तपासात सर्वप्रकारचे सहकार्य मी देणार आहे, असे आमदार नीतेश राणे यांनी म्हटले आहे.मुंबई येथील सांताक्रुझ पोलिसांनी नीतेश राणेंसह तिघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाबाबत नीतेश राणे यांनी शनिवारी प्रसिद्धिपत्रकातून माहिती दिली. हे प्रकरण म्हणजे एका षड्यंत्राचा भाग आहे. या रेस्टॉरंटमध्ये जोरजोरात गाण्यांचा आवाज केला जातो. रात्री उशिरापर्यंत ही गाणी सुरू असतात. पहाटे चार-पाच वाजेपर्यंत या रेस्टॉरंटमध्ये असा धुमाकूळ आणि जोरजोराने गाण्यांचे आवाज सुरू असतात. याबद्दल नारायण राणे यांनी स्थानिकांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई महानगरपालिका आयुक्त या दोन्ही अधिकाऱ्यांना पत्र लिहून जनतेला होणाऱ्या त्रासाची जाणीव करून दिली होती. रेस्टॉरंटमधील घटनांबाबत कार्यवाही करण्याचेही सांगितले होते, असेही या पत्रकात म्हटले आहे.कॉल रेकॉर्ड तपासणारजुहू रोड परिसरात आॅक्टोबर २०१६ पासून निखिल मिराणी आणि हितेश केसवानी (३१) यांचे एस्टेला हॉटेल सुरू आहे. नीतेश राणे यांनी या हॉटेलमध्ये भागिदारीसह दर महिन्याला १० लाख रुपये देण्याची मागणी केल्याचा आरोप केसवानी यांनी केला आहे. त्यातूनच गुरुवारी रात्री हॉटेलमध्ये घुसखोरी करत तोडफोड केल्याची तक्रार त्यांनी केली आहे. त्यानुसार सांताक्रु झ पोलिसांनी नीतेश राणेंसह त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध खंडणी, घुसखोरी करुन मारहाण, शिविगाळप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.केसवानी यांच्या कॉलवर राणेंनी केलेला कॉल रेकॉर्डही मागविण्यात आला आहे. हे कॉल रेकॉर्ड तपासणार असून मोबाईल सीडीआरच्या आधारे याप्रकरणाची अधिक चौकशी हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच राणे यांची चौकशी करत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सांताक्रुझ पोलिसांनी दिली.