ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. ११ - चॉकलेट समजून फटाका खाल्ल्याने चिमुरडीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खेडमधील तिसंगी गावात घडली. दामिनी संदीप निकम असे या चिमुरडीचे नाव असून दामिनीच्या मृत्यूमुळे तिसंगी गावात शोककळा पसरली आहे.
तिसंगी गावात राहणा-या पाच वर्षाच्या दामिनीला घराबाहेर फटाक्यांचा बॉक्स आढळला. फटाक्यांना चॉकलेट समजून दामिनीने एक फटाका खाल्ला होता. काही वेळाने दामिनी काही तरी चघळत असल्याचे तिच्या आईवडिलांच्या लक्षात आले. त्यांनी दामिनीच्या तोंडातून फटाका काढलादेखील होता. मात्र काही वेळाने दामिनीची प्रकृती खालावल्याने तिला कळंबणीतील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दामिनीचा मृत्यू झाला.