शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

दीपनगरात वीज निर्मिती पूर्ववत

By admin | Updated: October 20, 2016 18:56 IST

१७ सप्टेंबर पासून बंद असलेली महाजनकोच्या दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील वीज निर्मिती आज पूर्ववत सुरू झाल्याची माहिती मुख्य अभियंता अभय हरणे यांनी ‘लोकमत’ला दिली

ऑनलाइन लोकमतभुसावळ, दि. २० : १७ सप्टेंबर पासून बंद असलेली महाजनकोच्या दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील वीज निर्मिती आज पूर्ववत सुरू झाल्याची माहिती मुख्य अभियंता अभय हरणे यांनी ‘लोकमत’ला दिली. महाजनकोकडून दीपनगर वीज केंद्रातील ५०० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक चार कार्यान्वित करण्यासाठी सज्ज ठेवण्याचे आदेश आज सकाळी सहा वाजता प्राप्त झाल्याचे हरणे यांनी सांगितले.त्यानुसार संच क्रमांक चार हा कार्यान्वित करण्यात आला आहे शिवाय ५०० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक पाच पहाटे कार्यान्वित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महिनाभर वीज निर्मिती होती ठप्पतब्बल महिनाभर दीपनगरातील वीज निर्मिती बंद होती.त्यामुळे रेल्वेसह अन्य उद्योगांना याचा फुटका बसला होता. कोळसा वाहतूक होत नसल्याने रेल्वेला दिवसाला दहा कोटी रुपयांचे नुकसान होत होते. शिवाय वीज निर्मिती होत नसल्याने राखेची वाहतूक बंद होती.सुमारे १०० बल्कर वाहने महामार्गावर ठिकठिकाणी थांबून होती. हजारो कामगार हातावर हात धरुन बसले होते. वीज निर्मिती पूर्ववत झाल्याने कंत्राटी कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

कामगार संघटनांनीही समाधान व्यक्त केले आहे.एलडीकडून आदेश प्राप्तदरम्यान, कळवा येथील लोड डिसपॅच सेंटरकडून (भारनियमन केंद्र) आधी संच क्रमांक चार कार्यान्वित करण्याचे आदेश आले आहेत.त्यानंतर पहाटे संच क्रमांक पाच सुरू करण्याचे आदेश आल्याची माहिती सूत्रांनी दिली.लवकरच संच क्रमांक तीनही सुरू होण्याची शक्यता आहे.

दीपनगर पुन्हा गजबजणारमहिनाभर थंड असलेले दीपनगर शुक्रवारपासून पुन्हा गजबजायला लागेल.कंत्राटी कामगारांनाही त्यांचे नेहमीचे काम मिळेल.वीज निर्मिती सुरू झाल्याने कोळशाचे रेकची संख्या वाढणार आहे.त्याचा फायदा रेल्वेला होणार आहे. सीमेंट प्रकल्पही पुन्हा सुरू होणार आहे.

मागणी वाढल्याचा परिणामदरम्यान,पाऊस थांबला आहे.कडक उन पडत आहे.त्यामुळे राज्याची वीजेची मागणी वाढली आहे.ती आज तब्बल १८ हजार मेगावॅट इतकी वाढली आहे.त्यामुळेच बंद पडलेले वीज निर्मिती संच कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तापीनदीचे मुबलक पाणी, भरपूर कोळसा आणि श्रम असताना या वर्षी दीपनगरातील वीज निर्मिती प्रथमच बऱ्याचदा बंद पडली.त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.