शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत घमासान

By admin | Updated: February 3, 2017 23:16 IST

मनपा निवडणुकांसाठी शुक्रवारी उमेदवारांच्या नावांचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर राजकीय पक्षांमधील अंतर्गत धुसफूस समोर आली.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 3 - मनपा निवडणुकांसाठी शुक्रवारी उमेदवारांच्या नावांचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर राजकीय पक्षांमधील अंतर्गत धुसफूस समोर आली. तिकीट न मिळाल्यामुळे भाजपाच्या काही इच्छुकांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर शक्तिप्रदर्शन केले. तर जागावाटपावरून काँग्रेसच्या नेत्यांविरोधात कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. एकूणच प्रचाराची धामधूम सुरू होण्याअगोदरच पक्षांमध्ये राजकीय दंगल सुरू झाल्याचे दिसून आले.शुक्रवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अखेरची तारीख असल्यामुळे एबी फॉर्म नेमके कुणाला मिळणार यासंदर्भात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या उमेदवारांमध्ये गुरुवारपर्यंत संभ्रम कायम होता. अखेर शुक्रवारी सकाळी चित्र स्पष्ट झाले. भाजपाकडून तब्बल २४ विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आली. यावरून काही नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर श्रीकांत आगलावे यांच्यासह काही इच्छुकांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन केले. तर प्रस्थापित नगरसेवक गोपाळ बोहरे यांच्या समर्थकांनी प्रतापनगर भागात निदर्शने केली. बसपाच्या चार विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापण्यात आले तर तीन माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आली. आसीनगर झोन कार्यालयात यावरून नवीन उमेदवारांसोबत प्रस्थापितांच्या समर्थकांचा शाब्दिक वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊ नये यासाठी पक्षाने यादीच जाहीर न करण्याचे धोरण घेतले हे विशेषकाँग्रेसमध्ये एबी फॉर्मवरून वाददुसरीकडे अखेरच्या दिवशी काँग्रेसमध्ये एबी फॉर्मवरून वादावादी दिसून आली. उत्तर नागपुरात आपल्या समर्थकांना कमी जागा मिळाल्याचा आरोप करत माजी मंत्री नितीन राऊत यांनी एबी फॉर्म सुरुवातीला नाकारले. कोणताही उमेदवार लढणार नाही, अशी त्यांनी भूमिका घेतली. अखेर काही नेत्यांच्या मध्यस्थीनंतर ते एबी फॉर्म घेऊन गेले. मात्र संबंधित प्रभागात कुठलाही धोका नको म्हणून २ असा क्रमांक लिहून १२ ते १४ उमेदवारांना नव्याने एबी फॉर्म देण्यात आले. यावरून तणाव निर्माण झाला होता. काँग्रेसचे नेते अभिजित वंजारी यांच्यावर यातूनच राऊत समर्थकांनी धावा बोलला व आपला संताप व्यक्त केला.