शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

पावसाअभावी अघोषित भारनियमन

By admin | Updated: July 14, 2015 01:35 IST

पाऊस लांबल्याने कृषीपंपाचा वाढलेला वापर, हवामानात बदलामुळे वाढलेल्या उष्णतेने १५ दिवसांत विजेच्या मागणीत सुमारे ३ हजार ते ३ हजार ५०० मेगावॅटने वाढ झाली.

मुंबई : पाऊस लांबल्याने कृषीपंपाचा वाढलेला वापर, हवामानात बदलामुळे वाढलेल्या उष्णतेने १५ दिवसांत विजेच्या मागणीत सुमारे ३ हजार ते ३ हजार ५०० मेगावॅटने वाढ झाली. मागणी व पुरवठ्यातील तूट भरून काढण्यासाठी सोमवारी महावितरणकडून राज्यात काही प्रमाणात अघोषित भारनियमन करण्यात आले.राज्यात गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. परिणामी, कृषीपंपाचा वापर वाढला आहे. त्यामुळे १५ दिवसांपूर्वी राज्याची असलेली १३ हजार ५०० ते १४ हजार मेगावॅट विजेची मागणी अचानक वाढून ती १६ हजार ते १६ हजार ५०० मेगावॅटपर्यंत गेली. महानिर्मितीचे परळीमधील सर्व संच पाण्याअभावी बंद आहेत. महानिर्मितीकडून ४ हजार ५०० मेगावॅट अपेक्षित असलेली वीज केवळ ३ हजार ८०० मेगावॅटपर्यंत उपलब्ध होत आहे. शिवाय पवन ऊर्जेतूनही १ हजार ८०० ते २ हजार २०० मेगावॅट अपेक्षित असलेली वीज केवळ १ हजार मेगावॅटपर्यंत उपलब्ध होत आहे. तिरोडामधील अदानी पॉवरचा संच क्रमांक ४ आणि अमरावतीमधील रतन इंडिया प्रकल्पातून अपेक्षित वीज उपलब्ध झाली नाही. त्यामुळे राज्यात सकाळी पावणे दहा वाजता काही ठिकाणी भारनियमन करण्यात आले. कोयनामधील २५० मेगावॅटचा संचही सुरू झाल्याने विजेची उपलब्धता वाढल्याने सायंकाळी उशिरापर्यंत भारनियमनाचे प्रमाण कमी झाले. या सर्व बाबी लक्षात घेता महावितरणने कृषीपंपाचे भारनियमन करण्यात येणार नाही, अशी दक्षता घेतली आहे. त्यांना निश्चित असलेला वीजपुरवठा सुरूच राहणार आहे. (प्रतिनिधी)मागणीत मोठी वाढकेंद्रीय ग्रीडमधून वीज घेऊनही तीव्रतेत तफावत दिसून आली. परिणामी, भारनियमनाचे प्रमाण वाढले. हे भारनियमन आटोक्यात आणण्यासाठी पॉवर एक्सचेंजमधून १ हजार ते १ हजार २०० मेगावॅट वीज काही तासांसाठी विकत घेण्यात आली. आणखी काही दिवस अशीच स्थिती राहिल्यास भारनियमन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.