शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

अस्वस्थ करणारी असुरक्षा

By admin | Updated: August 19, 2014 23:08 IST

राजकीय नेते, पदाधिकारी यांना झेड प्लस संरक्षणाचे कवच देणा:या पोलिसांकडून सामाजिक कार्यकत्र्याच्या सुरक्षितेकडे मात्र पूर्णपणो दुर्लक्ष केले जात आहे.

पुणो : राजकीय नेते, पदाधिकारी यांना झेड प्लस संरक्षणाचे कवच देणा:या पोलिसांकडून सामाजिक कार्यकत्र्याच्या सुरक्षितेकडे मात्र पूर्णपणो दुर्लक्ष केले जात आहे. सामाजिक कार्यकर्ते संरक्षण मागायला येण्याची वाट पाहत न बसता पोलिसांनी स्वत:हून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी उचलली पाहिजे, अशी भावना कार्यकत्र्याकडून व्यक्त केली जात आहे.
 
अंधo्रध्दा निमरुलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाला 1 वष्रे पूर्ण होत आहे. डॉक्टर दाभोलकरांच्या कामामुळे ज्यांच्या हितसंबंधाला धोका पोहचत होता, त्यांनी दाभोलकरांचा खून घडवून आणला. एक वष्रे उलटला तरी डॉक्टरांच्या मारेक:यांचा पोलीस शोध लावू शकले नाहीत याची अस्वस्थता, खंत कार्यकत्र्याच्या मनात आहेच. त्याचबरोबर जे पोलिसांना करता येणं सहज शक्य आहे, त्याही गोष्टी त्यांच्याकडून केल्या जात नसल्याने कार्यकत्र्याची नाराजी वाढली आहे.
राज्यमंत्र्यापासून ते पंतप्रधान, राष्ट्रपतींर्पयतच्या संरक्षणासाठी पोलिसांची मोठा ताफा दिवस-रात्र राबविला जातो, पोलिसांचे मोठे मुनष्यबळ त्यासाठी खर्ची पाडले जाते. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उभे राहणा:या सामाजिक कार्यकत्र्याच्या संरक्षणाचा मात्र कोणताही दीर्घकालीन विचार पोलिसांकडून केला जात नाही.
प्रतिशयत सामाजिक कार्यकत्रे कधीही पोलीस संरक्षण मागत नाहीत, उलट पोलिसांनी संरक्षण दिले तरी त्यांच्याकडून नाकारले जाण्याचीच शक्यता असते. कार्यकत्र्याच्या  कामामुळे कोणाचे हितसंबंध दुखावले जात आहेत, कुणाकडून त्यांना दगाफटका होऊ शकतो याचा आढावा पोलिसांच्या विशेष शाखेने घेऊन त्यांना संरक्षण दिले जाणो आवश्यक आहे. कार्यकत्र्याचे संरक्षण हा पोलिसांच्या अग्रक्रमावरील विषय कधीच असत नाही, राजकीय नेत्यांच्या मागे पुढे करण्यातच त्यांची सगळी शक्ती खर्च होते, याबदद्ल मोठयाप्रमाणात नाराजी कार्यकत्र्याकडून व्यक्त होत आहे. आरोपींना पकडण्यात येणा:या अपयशामुळे ती भावना प्रबळ होत आहे.
पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते सुभाष वारे म्हणाले, ‘‘प्रत्येक कार्यकत्र्याला संरक्षण पुरविणो पोलिसांना शक्य नाही, पोलीस यंत्रणोचा धाक असायला हवा. राजकीय दबावाखाली पोलीस अनेकदा कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत. त्यातून कार्यकत्र्याच्या मनात असुरक्षितेची भावना मोठयाप्रमाणात निर्माण होते.’’
रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार म्हणाले, ‘‘‘कार्यकत्र्याच्या मनामध्ये असुरक्षितेची भावना का निर्माण होते आहे याचा 
शोध घेण गरजेचं आहे. कार्यकत्र्यानी पोलीसांकडे तक्रार केल्यास ती गांभीर्याने घेतली गेली 
पाहिजे. पोलिसांची यंत्रणा आतून पोखरल्याचे वाईट चित्र दिसून येते.’’ (प्रतिनिधी)
 
विवेकनिष्ठ समाजापुढे प्रतिगाम्यांचे आव्हान
तर राज्यकर्ते म्हणून राहण्याचा अधिकार नाही 
राज्य शासन जर सामाजिक कार्यकत्र्याना सुरक्षा देऊ शकत नसतील तर राज्यकर्ते म्हणून राहण्याचा त्यांना अधिकार नाही. प्लँचेट प्रकरणामध्ये कारवाई करण्यास शासनाने ज्यापध्दतीने दिरंगाई केली ती पाहता त्यांना काही करायच आहे अस वाटत नाही. या अक्षम्य दिरंगाई बदद्ल जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टरांच्या खूनाचा तपास सीबीआयकडून अत्यंत संथ गतीने सुरू आहे, अजून प्राथमिक माहिती गोळा करण्याचेच काम सीबीआयचे अधिकारी करीत आहेत. सतीश शेटट्ी खून प्रकरणामध्ये ज्या पध्दतीने क्लोजर रिपोर्ट दिला गेला त्याप्रमाणो सीबीआयने शेवटी याही प्रकरणात तसेच काही करू नये अशी साधार भीती वाटते. दाभोलकरांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पाश्र्वभुमीवर शासनाच्या निष्क्रीयतेचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यभर अंनिसचे कार्यकर्ते निर्दशने करणार आहेत. मागील वर्ष खूप वेदनादायी ठरले पण डॉक्टरांवरील हल्लाने समाज अविवेकी करण्याचे काम थांबणार नाही . 
- हमीद दाभोलकर, सचिव, अंनिस
 
विवेकनिष्ठ समाज निर्माण करायचे आव्हान
मुळात डॉ. दाभोलकरांची हत्या ही व्यक्तीची हत्या नाही तर विचारालाच मारायचा तो प्रयत्न आहे. यावरून आव्हान किती मोठे आहे याची कल्पना येते. डॉक्टरांचे खुनी सापडत नाहीत हा तर नाकर्तेपणा आहेत. पण त्यामुळे कुठल्या विचारांशी आपला सामना आहे हे लक्षात येते. या खुनाचे सूत्रधार जगापुढे येणो गरजेचे आहेत. आमचे तर आव्हानच आहे की त्यांनी असे भ्याडासारखे लपून न बसता समोर यावे. या खुनामुळे महाराष्ट्राच्या फुले,आंबेडकर, रानडे, आगरकर यांच्या परंपरेवर मरोठा आघात झाला आहे. त्यातून सावरून विवेकनिष्ठ समाज तयार करणो हे सगळ्यात महत्वाचे आहे. उदया आपण निर्धार दिन साजरा करणार आहेात. संताप तर आहेच. पण तो संयमानेच व्यक्त करायचा आहे.अविवेकाबरोबर  संघर्ष ही करायचा आणि सहिष्णुताही पाळायची असे हे दुहेरी आव्हान आहे. 
- सुनीती सु.र. (सामाजिक कार्यकत्र्या)
वाईटाविरुद्ध संघर्ष सुरू राहावा
आपल्याला जे योग्य वाटते ते सतत बोलले पाहिजे. गप्प रहाता कामा नये. शक्य त्या पतळीवर व्यक्त झालेच पाहिजे. या खुनाच्या निमित्ताने तरूणांपासून 
सगळ्या थरातील लोकांचा या विवेकवादी चळवळीला पाठिंबा मिळाला ही त्यातल्यात्यात चांगली गोष्ट. जोगेश्वरीतल्या तरूणीला जातपंचायतीविरूध्द न्याय मिळाला हा दाभोलकरांच्याच कामाचा परिणाम आहे. वाईटाविरूध्द उठाव सतत करत रहाणो हीच त्यांनी श्रध्दांजली ठरेल.
- नंदू माधव (अभिनेते)
सतत विचार मांडत राहाणो महत्त्वाचे
एखादा विचार पटत नाही म्हणून तो दाबून टाकायचा यात मला तरी काही अर्थच वाटत नाही. या सगळ्यातून प्रतिगामी विचार लादले जाताहेत का याची शंका येते.  याला विरोध करायचा तर आपण त्यांच्या थराला जाणो हा उपाय नाही. पण तरीही मला वाटते की डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर जेवढा मोठा विरोध व्हायला हवा होता. तेवढा तो जाहीररीत्या झालाच नाही. गांधीजीनी जसे मोठया प्रमाणावर सत्याग्रह केले होते तसे यावेळी व्हायला हवे होते. लोकांना त्यासाठी तयार करायला नेते कमी पडताहेत की काय अशी शंका वाटते. हा विरोध किंवा याबददलचा संताप अधिक तीव्रपणो व्यक्त व्हायला हवा. यासाठी लोकांनी जागृत व्हायाला हवे. आपल्याला जे वाटते ते सतत मांडत रहायला हवे. राज्यात एवढी निरनिराळी मंडळे आहेत. त्यांनी त्यांच्या जवळच्या पोलिस चौकीसमोर निदर्शने करायला हवीत. 
- दीपा लागू( ज्येष्ठ अभिनेत्री)
ज्येष्ठ मित्रंना दु:ख
डॉ. नरेंद्र दाभोलकर जाऊन वर्ष झाले परंतु अद्याप त्यांच्या मारेक:यांचा तपास लागलेला नाही, ही खरोखर खेदाची गोष्ट आहे. आमच्या सारख्या ज्येष्ठ मित्रपरिवाराला या गोष्टीचे सर्वाधिक दु:ख आहे. दाभोलकरांच्या कार्याच्या दोन बाजू होत्या असे मला वाटते. अंधश्रध्दा निमरुलन वार्तापत्र व साधना साप्ताहिक. त्यांनी हे कधीच एकत्र केले नाही. या दोन कार्यक्षत्रमधील अंतर त्यांनी कायम सांभाळले. एवढा संयम ठेवणो अवघड आहे. ते प्रत्यक्ष कार्य करणारे कर्मयोगी होते. ही त्यांची एक बाजू असली तरी, दुस:या बाजूला ते कृतिशील विवेकवादीही होते.  
- रा. ग. जाधव (ज्येष्ठ समीक्षक)
 
चळवळ पुढे नेणो महत्त्वाचे
डॉ. नरेंद्र दाभोलकर एक वर्षापूर्वी गेले हे अजूनही पूर्णपणो स्वीकारू शकलेलो नाही. अंनिसच्या चळवळीतल्या कामाचे ते सूत्रधार असायचे. त्यांचे अशा स्वरूपात असणो हे प्रत्येक कार्यकत्र्याला सुरक्षित कवच म्हणून लाभले होते. त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्याशिवाय काम करणं, कार्यरत रहायचं हे मन स्वीकारायला कचरत आहे. वर्षभरापूर्वी अचानक झालेला खून पाहता विचारांच्या पातळीवर विरोध करणारे शरीरच संपवतील अश्ी अपेक्षाच नव्हती. मात्र या घटनेतील मारेकरी, सूत्रधार जे अजूनही समाजाच्या समोर नाही त्यांना जर असे वाटले असेल की, या कामाचा विचार, प्रवक्ता, नेतृत्व संपवले तर हे काम विस्कळीत होईल थांबेल तर तसे घडलेले नाही. या कसोटीत आम्ही पूणार्थाने पासच झालो आहोत. मोडून न पडता उभे राहिलो. या श्विाय या कामाची गती कायम ठेवण्याचा प्रय} आम्ही सामूहिक नेतृत्वातून केले. मोठे आव्हान जादूटोणाविरोधी कायद्याचे होते. डॉक्टरांनंतर या कायद्याला वाली राहिला नाही असे वाटणा:यांसमोर हा कायदा मंजूर झाला. डॉक्टरांची कमतरता, पोकळी तर कायमच राहणार आहे. ती कधीच भरून निघणार नाही. महाराष्ट्र फाऊंडेशनने त्यांना दशकतला कार्यकर्ता म्हणून गौरव केला होता. मात्र ते पाव शतकातील उत्कृष्ट कार्यकर्ते होते असे म्हटले तर चूक होणार नाही. 
- अविनाश पाटील (अंनिसचे राज्य कायाध्र्याक्ष )