शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

सदाभाऊंबद्दलच्या नाराजीने ‘स्वाभिमानी’त अस्वस्थता

By admin | Updated: February 13, 2017 22:27 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलूखमैदान तोफ अशी ख्याती असलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या उमेदवारीवरून संघटनेचे

 विश्वास पाटील/ ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 13 - स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलूखमैदान तोफ अशी ख्याती असलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या उमेदवारीवरून संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने संघटनेतील कार्यकर्त्यांत सोमवारी सायंकाळनंतर अस्वस्थता पसरली. या दोन नेत्यांतील दुही संघटनेली परवडणारी नाही अशी भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त झाली. अगोदरच शेतकऱ्यांची बाजू घेवून लढणारे कमी आहेत त्यात आणखी असलेल्यांच्यात दुही निर्माण झाली तर त्यातून नुकसान चळवळीचेच होईल अशीही प्रतिक्रिया कांहीनी व्यक्त केली.शेतकरी चळवळीचे लढाऊ नेते दिवंगत शरद जोशी यांच्यापासून फारकत घेवून शेट्टी यांनी २००२ मध्ये स्वाभिमानी संघटना स्थापन केली. त्यानंतर पुढे नाशिकच्या मोटारसायकल रॅलीवेळी २००८ मध्ये सदाभाऊ खोत यांनी बिंदू चौकात झालेल्या कार्यक्रमावेळी संघटनेत प्रवेश केला. रांगड्या भाषेत अत्यंत आक्रमकपणे सरकारवर तुटून पडणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख. त्यांना संघटनेने २०१४ च्या निवडणूकीत माढा मतदार संघातून लोकसभेला उभे केले. चांगली लढत देवूनही त्यांचा पराभव झाला. त्यावेळी हातकणंगले मतदारसंघातून खासदार शेट्टी हे दुसऱ्यांदा विजयी झाले. स्वाभिमानी हा भाजप आघाडीतील मित्रपक्ष असल्याने शेट्टी यांनीच सदाभाऊंना मंत्री करणार असल्याची पहिल्यांदा घोषणा केली. संघटनेमुळेच आपल्याला खासदारकी मिळाली, त्याच संघटनेच्या वाटचालीत सदाभाऊंचाही योगदान असल्यामुळे त्यांनाही सत्तेची सावली कधीतरी मिळावी या भावनेने त्यांनी त्यांच्या मंत्रीपदासाठी आग्रह धरला. भाजपने त्यांना त्यांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर घेवून कृषी राज्यमंत्री केले. पुढच्या टप्प्यात जानेवारीत स्वच्छता व पाणी पुरवठा राज्यमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला. त्याचवेळी शेट्टी यांच्या नाकावर टिच्चून भाजपने सदाभाऊंना वजनदार केल्याची चर्चा सुरु झाली होती. त्याचदरम्यान शेट्टी हे देखील भाजपवर शेलक्या भाषेत टीका करु लागले होते. सदाभाऊंना बळ देवून भाजप संघटनेत वात लावत असल्याची भावना त्यांच्याही मनांत तयार झाली होती परंतू जाहीर व्यासपीठावरून ते आपल्यात कोणताही वाद नसल्याचे सांगत होते. चार दिवसांपूर्वीच नृसिंहवाडी येथे झालेल्या पक्षाच्या प्रचार प्रारंभासही हे दोघे नेते एकत्र होते.मी स्वाभिमानीचाच आहे परंतू भाजपसोबत असल्याचे सदाभाऊ सांगत होते. राज्यमंत्रीमंडळात असल्याने त्यांना तसे सांगणे भाग होते. त्यात कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपने स्वाभिमानी सोबत आघाडी केली नाही. तेवढेच करून भाजप गप्प बसलेला नाही. शिरोळमध्येच संघटनेला कसे रोखायचे अशी मोहिम भाजपकडून राबवली जात असल्याचे शेट्टी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्या उद्वेगातूनच त्यांनी सदाभाऊंच्या घराणेशाहीबद्दलची भावना बोलून दाखवली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संघटना आहे म्हणून दोघांचेही अस्तित्व आहे. त्यातून बाजूला गेले त्यांची अवस्था आता ना घरका ना घाटका...अशी झाली आहे. त्यामुळे वाद असले तरी हे दोन्ही नेते तो विकोपाला जावू देणार नाहीत व संघटनेच्या व्यापक हिताला, शेतकरी चळवळीला प्राधान्य देतील असा विश्र्वासही कार्यकर्त्यांतून व्यक्त झाला.