शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांचा धडाका सुरूच

By admin | Updated: January 16, 2017 02:55 IST

बेकायदा बांधकामांच्या विरोधात सिडको, महापालिका आणि एमआयडीसीने बेकायदा बांधकामांच्या विरोधात धडक मोहीम राबविली.

नवी मुंबई : गेल्या वर्षभरात बेकायदा बांधकामांच्या विरोधात सिडको, महापालिका आणि एमआयडीसीने बेकायदा बांधकामांच्या विरोधात धडक मोहीम राबविली. याअंतर्गत जवळपास साडेतीन हजार लहान-मोठी बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. मात्र, या कारवाईला न जुमानता भूमाफियांनी आपल्या कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. याचा परिणाम म्हणून गेल्या वर्षात जवळपास साडेआठशे नवीन बांधकामे उभारल्याचे दिसून आले आहे. बेकायदा बांधकामांमुळे सायबर सिटीतील मूळ गावे व गावठाणांना बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. फिफ्टी -फिफ्टीच्या नावाखाली रातोरात इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्यातील घरे गरजूंच्या माथी मारून भूमाफिया परागंदा झाले आहेत. एकूणच माहिती व तंत्रज्ञानाच्या या सुनियोजित शहरात बेकायदा बांधकामांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. उच्च न्यायालयाने २0१२ पूर्वीच्या बांधकामांना अभय दिले आहे. त्यानंतर म्हणजेच जानेवारी २0१३नंतर उभारलेल्या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधित प्राधिकरणांना दिले आहेत. त्यानुसार सिडको, महापालिका व एमआयडीसीने कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या वर्षभरात या तिन्ही प्राधिकरणांनी आपापल्या क्षेत्रात कारवाई करून जवळपास साडेतीन हजार लहान-मोठी बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. यात सर्वाधिक म्हणजेच २000 बांधकामांवर सिडकोच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकीकडे कारवाई सुरू असताना दुसरीकडे त्याच जोमाने नवीन बांधकामे उभारण्यात आली आहेत. गेल्या वर्षभरात महापालिका क्षेत्रातील विविध भागांत जवळपास साडेआठशे नवीन बांधकामे उभारली गेल्याचे दिसून आले आहे. यात सर्वाधिक बांधकामे विधानसभेच्या ऐरोली मतदार संघ क्षेत्रात उभारली गेली आहेत. यावरून बेकायदा बांधकामांवरील कारवाईला भूमाफियांनी सपशेल केराची टोपली दाखविल्याचे दिसून येते.>कारवाईचा तपशीलगेल्या वर्षभरात महापालिकेने जवळपास ३०० अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली.सिडकोने आपल्या कार्यक्षेत्रातील नवी मुंबई परिसरात पालिकेसोबत संयुक्त कारवाई करून सुमारे २००० लहान-मोठी बांधकामे जमीनदोस्त केली.एमआयडीसीनेही महापालिका व सिडकोसोबत कारवाई करून जवळपास १००० बांधकामांवर हातोडा चालविला.न्यायालयाच्या आदेशानुसार ४०० पैकी १०० धार्मिकस्थळांवर कारवाई झाली.>मुख्यमंत्र्यांच्या घोषणा भूमाफियांच्या पथ्यावरउच्च न्यायालयाने २0१२ पर्यंतच्या बांधकामांना अभय दिले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २0१५ पर्यंतची सरसकट सर्वच बेकायदा बांधकामे नियमित करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा भूमाफियांच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे. २0१५ पर्यंतची बांधकामे नियमित होणार असतील, तर त्यानंतरचीसुद्धा नियमित होतील, असा अशावाद वाढल्याने भूमाफियांनी कारवाईला भीक न घालता बेकायदा बांधकामांचा धडाका सुरूच ठेवल्याचे दिसून आले आहे.