शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

आदेशानंतरही दिघ्यात अनधिकृत इमारती

By admin | Updated: December 22, 2016 04:10 IST

नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामांची पाहणी करून ती तोडण्याचे आदेश देऊनही दिघामध्ये सुमारे ५०० बांधकामे अनधिकृतरीत्या

मुंबई : नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामांची पाहणी करून ती तोडण्याचे आदेश देऊनही दिघामध्ये सुमारे ५०० बांधकामे अनधिकृतरीत्या बांधण्यात आली असल्याची माहिती बुधवारी याचिकाकर्ते राजीव मिश्रा यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयाला दिली. उच्च न्यायालयाने यासंदर्भात ४ जानेवारी रोजी सुनावणी ठेवली आहे. दिघ्यामध्ये खासगी, तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या जागेवर बेकायदेशीर बांधकामे उभारण्यात आल्याबद्दल नवी मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते राजीव मिश्रा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती.३० जुलै २०१५ रोजी उच्च न्यायालयाने अस्तित्वात असलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा चालवण्याचा आदेश नवी मुंबई महापालिका, सिडको आणि एमआयडीसीला दिला, तसेच यापुढे बेकायदेशीर बांधकाम उभारण्यात येऊ नयेत, यासाठी वारंवार पाहणी करण्याची व तक्रार करण्यासाठी संकेतस्थळ आणि व्हॉट्स अ‍ॅप नंबरही नागरिकांना उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. मात्र, उच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून ३० जून २०१५ नंतर नवी मुंबईच्या हद्दीत सुमारे ५०० बेकायदेशीर बांधकामे उभी करण्यात आली. राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतच्या सर्व बेकायदेशीर बांधकामांना नियमित करण्यासंदर्भात धोरण काढल्याने विकासकांनी चांगलीच संधी घेतली.मिश्रा यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, नवी मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावर पालिकेच्या हद्दीतील बेकायदेशीर बांधकामांची आकडेवारी सादर करण्यात आली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या हद्दीत ३०३ बेकायदेशीर बांधकामे ३० जून २०१५ नंतर उभारण्यात आली आहेत, तर सिडकोने सादर केलेल्या यादीनुसार, महापालिकेच्या हद्दीत ११५ बेकायदेशीर बांधकामे बांधण्यात आली आहेत. याचिकाकर्त्याला आरटीआयद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, आणखी ११ बेकायदेशीर बांधकामांची भर पडली आहे.उच्च न्यायालयाने याची दखल घेत, याबाबत ४ जानेवारी रोजी सुनावणी ठेवली आहे. (प्रतिनिधी)सरकारच्या नव्या धोरणावर निर्णय?च्सरकारने ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासंदर्भात धोरण आखले आहे. मात्र हे धोरण उच्च न्यायालयाच्या मंजुरीशिवाय अंतिम केले जाऊ शकत नाही.च्बुधवारच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी खंडपीठाने यापूर्वी उपस्थित केलेल्या शंका विचारात घेऊन राज्य सरकारने धोरणात सुधारणा केल्याची माहिती खंडपीठाला दिलॅ. त्यावर खंडपीठाने या धोरणावर ४ जानेवारी रोजी निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले.