शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

उमरग्यात विराट मराठा मोर्चा

By admin | Updated: January 16, 2017 20:58 IST

मराठा समाजाला आरक्षण लागू करावे, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, शेतकऱ्यांच्या उत्पादीत शेतमालाला हमीभाव द्यावा आदी विविध न्याय मागण्यांसाठी

ऑनलाइन लोकमतउस्मानाबाद, दि. 16- मराठा समाजाला आरक्षण लागू करावे, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, शेतकऱ्यांच्या उत्पादीत शेतमालाला हमीभाव द्यावा आदी विविध न्याय मागण्यांसाठी सोमवारी उमरगा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने विराट मूकमोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चात तालुक्यासह सीमावर्ती भागातील, मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ विशेषत: यात महिला- मुलींची संख्याही लक्षणीय होती़.

स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा, अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर थांबवावा, शासकीय प्रकल्पांसाठी संपादीत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मावेजा तत्काळ देऊन त्यांना उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पात भागीदार करावे, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात मराठा समाजातील मुला-मुलींच्या उच्चशिक्षणासाठी आर्थिक तरतूद करावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतीपंपाचा विद्युतपुरवठा सुरळीत ठेवावा, उमरगा शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा, कर्नाटक सीमावर्ती भागातील मराठा समाजबांधवांचा महाराष्ट्रात समावेश करावा, उमरगा शहराचे नाव धाराशिव, असे करावे, गुंजोटी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रशासनाने हटविलेला पुतळा तत्काळ बसवावा आदी मागण्यांसाठी हा मूक मोर्चा काढण्यात आला़. 

सोमवारी सकाळपासूनच शहरात समाजबांधव हातात भगवे झेंडे घेवून शहरात दाखल होत होते़ राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्वेकडून येणाऱ्या गावातील मोर्चेकऱ्यांच्या वाहनांसाठी काळा मारुती मंदीर, आदर्श महाविद्यालय या ठिकाणी वाहनतळांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. पश्चिमेकडून येणाऱ्या विविध गावातील मोर्चेकऱ्यांसाठी गंधर्व हॉटेल मैदान, दत्त कॉलनी, शिंदे मंगल कार्यालय ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.

शहरातील दत्त मंदीर परिसरातून मोर्चास सोमवारी दुपारी १२़१५ वाजता सुमारास प्रारंभ झाला. दत्त मंदिरपासून थेट छत्रपती शिवाजी विद्यालयापर्यंत महिलांची स्वतंत्र रांग होती. मोर्चात उमरगा, लोहारा तालुक्यातील व कर्नाटक सीमावर्ती भागातील सकल मराठा समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या मोर्चात डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, व्यावसायिक, उद्योजक, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहभागी झाले होते़ मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकऱ्यांसाठी मराठा समाजबांधवांनी व मुस्लीम समाजबांधवांनी मोर्चाच्या मार्गावर विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध केली होती़. 

९६ गावातील नागरिकांचा सहभागयेथील सकल मराठा समाजबांधवांच्या मागील दिवसांपासून मराठा क्रांती मूकमोर्चाची तयारी सुरू होती. नियोजनाप्रमाणे या मोर्चात तालुक्यातील ९६ गावातील मराठा समाजबांधव व महिलांचा सक्रीय सहभाग असल्याचे दिसून आले. येथील बाबा पेट्रोल ते छत्रपती शिवाजी महाविद्यालय या तीन किमी अंतरापर्यंत महिला-पुरुषांच्या स्वतंत्र रांगा होत्या. स्वयंसेवकांकडून स्वच्छता मोहीममोर्चा शांततेत पार पडावा यासाठी १ हजार युवक स्वयंसेवकांची व २०० महिला स्वयंसेवकांची नियुक्ती केली होती. स्वयंसेवकांमार्फत मोर्चाच्या मार्गावर पडलेल्या कचऱ्याची साफ-सफाई करण्यात आली. सोमवारी दुपारपर्यंत येथील राष्ट्रीय महामार्ग भगवे ध्वज, मागण्यांचे फलक, भगवे फेटे, भगव्या टोप्या यांनी भगवामय झाल्याचे दिसून आले. राष्ट्रगिताने झाली सांगतादुपारी १२़१५ वाजेच्या सुमारास निघालेला मोर्चा २़३० वाजण्याच्या सुमारास येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात दाखल झाला. यावेळी गोदावरी गायकवाड हिच्या जिजाऊ वंदनेने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. साक्षी जाधव, पल्लवी जगताप, उषा इंगळे, गोदावरी गायकवाड, प्रतीक्षा इंगोले, स्नेहा जाधव यांन मनोगत व्यक्त केले. उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राष्ट्रगीतानंतर मोर्चाची सांगता झाली.