कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्या निवासस्थानी असलेली सुरक्षा व्यवस्था गेल्या चार दिवसांपासून हटविण्यात आली आहे. त्या विश्रांतीसाठी नाशिक येथे मुलीच्या घरी गेल्या आहेत. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रत्यक्षदर्शी उमा पानसरे यांच्या जीवितास धोका असल्यामुळे त्यांच्या निवासस्थानी चोवीस तास सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गेले दोन महिने सहायक पोलीस निरीक्षक मीना जगताप या पानसरे यांच्या घरी दिवसभर तळ ठोकून असायच्या. त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांची विचारपूस करूनच आतमध्ये सोडले जात होते. (प्रतिनिधी)
उमा पानसरे यांच्या निवासस्थानाची सुरक्षा हटवली
By admin | Updated: June 9, 2015 02:56 IST