शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

इस्लामपूरच्या अवलियाने जपलीय अ‍ॅम्बेसिडरची क्रेझ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2017 13:58 IST

वाहन उद्योगात दररोज नवनव्या बनावटीच्या चारचाकी मॉडेल्सची भर पडत असताना येथील सत्तर वर्षीय मुसा शहाबुद्दीन आगा यांनी मात्र

ऑनलाइन लोकमत,  इस्लामपूर (सांगली), दि. 19 -  वाहन उद्योगात दररोज नवनव्या बनावटीच्या चारचाकी मॉडेल्सची भर पडत असताना येथील सत्तरवर्षीय मुसा शहाबुद्दीन आगा यांनी मात्र १९६६ मधील अ‍ॅम्बेसिडर मोटारीला जीवापाड जपले आहे. विशेष म्हणजे या मोटारीवरच त्यांचा चरितार्थ चालतो आहे. एकेकाळी रूबाबदार अ‍ॅम्बेसिडर मोटार आणि पांढऱ्या शुभ्र गणवेशातील चालक ही क्रेझ काही औरच असे. जवळपास सर्वच मंत्री-नेते आणि उच्चपदस्थ अधिकारी ही मोटार वापरत असत. कालांतराने विविध कंपन्यांच्या मोटारी बाजारत आल्या. कंपन्यांनी चारचाकींमध्ये आधुनिकता आणत बदल केले. त्यामुळे अ‍ॅम्बेसिडरची क्रेझ कमी होत गेली. १९६५ ते १९८७ पर्यंत वाळवा तालुक्यातही अ‍ॅम्बेसिडरची जोरदार क्रेझ होती. राजारामबापू पाटील, एम. डी. पवार असे दिग्गज नेते अ‍ॅम्बेसिडरमधूनच जाताना दिसत. त्याच काळात येथील मणेर आणि आगा कुटुंबातील काही युवकांनी गांधी चौकाते २५ अ‍ॅम्बेसिडर मोटारींचा ताफा तैनात करुन त्या भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यावेळी या मोटारीला मागणीही चांगली होती. मुसा आगा मात्र १९७२ मध्ये चालक म्हणून दुसऱ्याच्या अ‍ॅम्बेसिडरवर रूजू झाले. नंतर १९७६ मध्ये त्यांनी १९६६ ची जुनी अ‍ॅम्बेसिडर आठ हजार रुपयांना घेतली. त्यावेळी नव्या अ‍ॅम्बेसिडरची किंमत १६ हजार होती. या मोटारीवर त्यांनी व्यवसाय सुरु केला. त्यावेळी डिझेलचा दर ९० पैसे लिटर, तर पेट्रोलचा दर १ रुपये २५ पैसे होता. इस्लामपुरातून सांगलीला स्पेशल भाडे ३० रुपये होते, तर पुण्याला जाऊन येण्यासाठी ४०० रुपये घेतले जात. त्या काळात पोलिसांना चिरीमिरी देण्याचा प्रकार नव्हता. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना फिरण्यासाठी म्हणून मोटार द्यावी लागे. सध्या पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. शिवाय इतर आलिशान मोटारींची रेलचेल वाढल्याने आता अ‍ॅम्बेसिडर मोटार भाड्याने नेण्यास कोणीच इच्छुक नसतात. मात्र आगा यांनी जनसंपर्काच्या जोरावर हा व्यवसाय आजही अ‍ॅम्बेसिडर मोटारीद्वारेच सुरु ठेवला आहे. येथील बसस्थानक परिसरात पहाटे सहालाच ते मोटारीसह तयार असतात. विशेष म्हणचे वयाच्या सत्तराव्या वर्षीही त्यांचा या व्यवसायातील उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे.