शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात ३२५ धोकादायक तर ३० अतिधोकादायक इमारती

By admin | Updated: May 10, 2014 20:59 IST

महापालिकेने ३२५ धोकादायक तर ३० अतिधोकादायक इमारतीची यादी प्रसिध्द केली असून धोकादायक इमारतींचा वाज व पाणीपुरवठा खंडीत करण्यात येत आहे.

उल्हासनगर - महापालिकेने ३२५ धोकादायक तर ३० अतिधोकादायक इमारतीची यादी प्रसिध्द केली असून धोकादायक इमारतींचा वाज व पाणीपुरवठा खंडीत करण्यात येत आहे. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून शिश महल ही अतिधोकादायक इमारत येत्या आठवडयात जमिनदोस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उल्हासनगर महापालिकेने पावसाळयात वित्त व जिवित हाणी टाळण्यासाठी इमारतीच्या सर्वेक्षणासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. पालिकेने ३२५ धोकादायक तर ३० अतिधोकादायक इमारतीची यादी प्रसिध्द करून इमारतीना नोटीसा दिल्या आहेत. तर अतिधोकादायक इमारती मधिल नागरीकांना पोलिस संरक्षणात बाहेर काढून त्या इमारतींचा वीज व पाण पुरवठा खंडीत करण्याचे आदेश आयुक्तांनी काढले आहेत़आयुक्त बालाजी खतगावकर यंानी अधिका-ंयाची बैठक घेऊन धोकादायक इमारतींबाबत नियमावली तयार केलीउ आहे़ शिवाय यासाठी स्थापन केलेल्या विशेष पथकात अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त संतोष दहेरकर, शहर अभियंत्ता रमेश शिर्के तसेच प्रभाग अधिकारी व शाखा अभियंत्याचा समावेश आहे. हे पथक इमारतीचे सर्वेक्षण करून धोकादायक इमारतीची यादी नव्याने प्रसिध्द करणार असल्याने, धोकादायक इमारतीच्या संख्येत वाढ होणार आहे.महापालिकेने गेल्या वर्षी ४ अतिधोकादायक इमारती जमिनदोस्त केल्या असून आर्थिक चणचणीमुळे उर्वरीत इमारतीवर पाडकामाची कारवाई ठप्प झाली होती. दरम्यान आता आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयासमोरील शिश महल ही अतिधोकादायक इमारत पुढील आठवडयात जमिनदोस्त करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ही इमारत जिर्ण झाली असून तिचा एकेक भाग कोसळत असल्याने परिसरात भिती निर्माण झाली आहे. दोन वर्षापूर्वी या इमारतीचा स्लॅब पडून ८ जणांचा बळी गेला होता़ महापालिकेकडे अपघातग्रस्तांसाठी कोणतीही यंत्रणा कार्यरत नसल्याने पावसाळयापूर्वीच अतिधोकादायक इमारतीतील नागरिकांना बाहेर काढण्याचे काम करावे लागणार आहे.