शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

‘मुक्त’च्या ५७ अभ्यासक्रमांना यूजीसीचा ब्रेक

By admin | Updated: July 13, 2016 21:07 IST

मुक्त विद्यापीठाच्या तब्बल ५७ अभ्यासक्रमांची यूजीसीने मान्यता रद्द केल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित झाला

सतीश डोंगरे/ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 13 - समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या मुक्त विद्यापीठाच्या तब्बल ५७ अभ्यासक्रमांची यूजीसीने मान्यता रद्द केल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी कुलगुरूंनीच मौन साधल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात १३५ अभ्यासक्रम चालविले जातात. त्यातील निम्म्याहून अधिक अभ्यासक्रम हे कौशल्यावर आधारित आहेत. दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देता यावे, या हेतूने विद्यापीठाने हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. मात्र यातील ५७ अभ्यासक्रमांची यूजीसीने मान्यता रद्द केल्याने अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे रद्द केलेल्या अभ्यासक्रमांमध्ये कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांचाच अधिक समावेश असल्याने ‘रोजगाराभिमुख शिक्षण’ या संकल्पनेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, डीएमएलटी, बीएससीआयडी, बी. ए. डिझायनिंग अशा कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांची मान्यता रद्द केली आहे. शिवाय या अभ्यासक्रमांचे प्रवेश शुल्कदेखील हजारो रुपये असल्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक फटकाही सहन करावा लागणार आहे. दरम्यान याप्रकरणी कुलगुरू तथा विद्यापीठ प्रशासनाने कुठलीही माहिती देण्यास असमर्थता दर्शविल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कारण रद्द केलेल्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचे काय तसेच या अभ्यासक्रमांची पदवी घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी अथवा रोजगाराच्या संधी कितपत असतील असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. ---पत्रकारिता अभ्यासक्रमाची मान्यता रद्दमुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाची पदवी घेऊन राज्यातील विविध भागात पत्रकारिता करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. सद्यस्थितीत पत्रकारिता या अभ्यासक्रमासाठी राज्यभरातील चार हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. मात्र, या अभ्यासक्रमाची मान्यताच रद्द केली गेल्याने या पदवीला कितपत महत्त्व असेल याबाबत सांशकता निर्माण झाली आहे. विद्यापीठाने यावर तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. ---आय अ‍ॅम नॉट अवेयरकुलगुरू डॉ. माणिक साळुंखे यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शविल्याने नवनिर्वाचित कुलसचिव डॉ. एकनाथ जाधव यांना याबाबत विचारले असता त्यांनी ‘आय अ‍ॅम नॉट अवेयर’ अशा शब्दामध्ये विषयाला बगल दिली. मी विद्यापीठात नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे मला या विषयाची काहीच कल्पना नसल्याचेही डॉ. जाधव यांनी सांगितले.