शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव विरुद्ध देवेंद्र राज्यभर घमासान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2017 04:32 IST

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी निवडणूक युती तोडल्याचे जाहीर केल्यानंतर आता महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत

यदु जोशी / मुंबईशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी निवडणूक युती तोडल्याचे जाहीर केल्यानंतर आता महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत उद्धव विरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे राजकीय युद्ध पाहायला मिळणार आहे. संयमी, पण राजकीय लढाईत आक्रमकपणा दाखविणारे उद्धव व देवेंद्र यांचे ‘ट्युनिंग’ कालपर्यंत चांगले होते. मात्र, युती तुटल्याने ‘वर्षा’ व ‘मातोश्री’ दरम्यानची हॉटलाइन बंद पडली असून हे दोघे एकमेकांविरुद्ध दंड थोपटताना दिसतील. फडणवीस यांनीही मुंबईसह राज्यात परिवर्तनाचा निर्धार व्यक्त करून शिवसेनेचे आव्हान स्वीकारले आहे. हिंदुत्वाच्या विचारधारांमधील हा मुकाबला असेल. मुंबईवर वर्चस्व कोणाचे याचा फैसला यानिमित्ताने होणार असल्याने दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. युती तुटल्याचा फायदा काँग्रेस व राष्ट्रवादी घेण्याचा निश्चितच प्रयत्न करेल. विशेषत: राज्यभर स्वत:ची व्होट बँक असलेली काँग्रेस या परिस्थितीचा फायदा घेण्यावर लक्ष केंद्रित करेल. पण गेली दोन वर्षे आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या राष्ट्रवादीला कितपत फायदा उठवता येईल, हा प्रश्न आहे. मात्र जिल्हा परिषदांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे, हेही तितकेच महत्त्वाचे. जबड्यात घालुनी हात...‘जबड्यात घालुनी हात, मोजतो दात, जात ही आमुची,’ असे ठणकावून सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला चुचकारले होते. आता त्यांचे (भाजपाचे) दात पाडायचेच काम मी करून दाखवतो, असा दणका उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.मुंबईत परिवर्तन - मुख्यमंत्री : जे येतील त्यांच्यासोबत, जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय. पण परिवर्तन तर होणारच, असे टिष्ट्वट करीत फडणवीस म्हणाले, सत्ता हे साध्य नाही तर ते विकासाचे साधन आहे. पारदर्शी कारभार हा आमचा मूलमंत्र आहे.पवारांना दु:ख : ‘युती तुटल्याचं अतीव दु:ख आहे,’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. शिवसेनेने राज्य सरकारचा पाठिंबा काढला तर राष्ट्रवादी सरकारला पाठिंबा देणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर ते उत्तरले, मी जर तरच्या प्रश्नांना उत्तर देत नाही. त्यांनी (भाजपा) काय तो निर्णय घ्यावा आणि मग चर्चेला यावं....तर मनसेचा फायदा झाला असतायुती झाली असती तर मुंबईत दोन्ही पक्षांचे बंडखोर मनसेच्या गळाला लागले असते आणि त्याचा फायदा मनसेला झाला असता. मात्र ती न झाल्याने राज ठाकरे यांना २०१२ च्या निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागेल. सत्तेत मात्र कायम : युती तुटली असली तरी राज्य सरकारमधून शिवसेना बाहेर पडणार नाही, आम्हाला महाराष्ट्र अस्थिर करायचा नाही, असे खा. संजय राऊत म्हणाले.