शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

उद्धव ठाकरेंचे हेलिकॉप्टरही तापले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:18 IST

बुधवारी नगरचे तापमान ३९ अंशावर होते. हेलिकॉप्टर उन्हात असल्याने तापले होते.

अहमदनगर : नाणार रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सरकारवर चांगलेच तापले असताना त्यांचे हेलिकॉप्टरही उन्हामुळे तापल्याने त्यांना कारने मुंबई परतावे लागले. नगर येथे बुधवारी हा प्रकार घडला.केडगाव येथे दुहेरी हत्याकांडात मयत झालेले शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी ठाकरे बुधवारी हेलिकॉप्टरने नगरला आले होते़ सकाळी ११ वाजता त्यांचे हेलिकॉप्टर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उतरले़ त्यानंतर ठाकरे कारने केडगावला गेले़ केडगाव येथून आल्यानंतर त्यांनी नगर शहरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला़ दुपारी २ वाजता ते हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना होणार होते़ पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर असलेल्या हेलिकॉप्टरमध्ये ठाकरे बसले. मात्र हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात आले़ १५ मिनिटे प्रयत्न करूनही हेलिकॉप्टर दुरुस्त झाले नाही़ बुधवारी नगरचे तापमान ३९ अंशावर होते. हेलिकॉप्टर उन्हात असल्याने तापले होते. त्यामुळेच कुलिंग सिस्टिमध्ये बिघाड झाल्याचे तंत्रज्ञांनी सांगितले. दुरुस्ती होत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ठाकरे हे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या कारमधून पुण्याकडे रवाना झाले़हेलिकॉप्टरचा बिघाड नित्याचाच!राज्यातील नेत्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने, ती चिंतेची बाब बनली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमध्ये चार वेळा तांत्रिक बिघाड झालेला आहे. निलंगा आणि अलिबाग येथे तर ते बालंबाल बचावले आहेत.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे