शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

कर्जमुक्तीच्या श्रेयासाठी मजा मारतंय कोण?, उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2017 10:46 IST

सामना संपादकीयमधून भाजपावर पुन्हा टीका करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 3 - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपावर पुन्हा टीका केली आहे. कर्जमुक्तीच्या श्रेयासाठी मजा मारतंय कोण?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून उपस्थित करत भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. 

राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती विषयावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.  ""कर्जमुक्तीसाठी लढले कोण आणि श्रेय घेण्यासाठी पानभर जाहिराती देऊन मजा मारतेय कोण! अर्थात श्रेय उपटणे आणि श्रेय लाटणे हा सध्याच्या राजकीय विचारसरणीचाच एक भाग बनला आहे, पण ‘पब्लिक सब कुछ जानती है’ या विश्वासावरच सध्या जग चालले आहे."", असा टोलादेखील उद्धव यांनी यावेळी हाणला आहे. 

काय आहे आजचे सामना संपादकीय ?
राजकारण हे सोय व फायदा-तोटा पाहूनच केले जाते. व्होट बँकांची फिकीर न करता निर्णय घेणारी फक्त शिवसेनाच! ज्याच्या हाती ससा तो पारधी हे आजच्या राजकारणातही सुरूच आहे. मतदारांना भुरळ पाडणाऱ्या घोषणांचा पाऊस नेहमीच पडत असतो. निवडणुकांचे घोडा मैदान जवळ आले की, सरकार जागे होते व जनहितकारी, पोटापाण्याच्या प्रश्नांवर ‘झटका’ निर्णय घेतले जातात. मग विरोधक त्यावर टीका करू लागतात. ‘गरिबी हटाव’ असो नाहीतर ‘अच्छे दिन’, या घोषणांचा नक्की काय व कसा फायदा झाला हा संशोधनाचा विषय असला तरी चांगल्याला चांगले म्हणून स्वीकारण्याची दानत आता राजकारणात उरलेली नाही.  राजकारण हे साधुसंतांचे राहिले नसल्याने अशा योजनांची चर्चा आणि राजकारण तर होणारच. जसे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत सध्या सुरू आहे. कर्जमुक्तीसाठी लढले कोण आणि श्रेय घेण्यासाठी पानभर जाहिराती देऊन मजा मारतेय कोण! अर्थात श्रेय उपटणे आणि श्रेय लाटणे हा सध्याच्या राजकीय विचारसरणीचाच एक भाग बनला आहे, पण ‘पब्लिक सब कुछ जानती है’ या विश्वासावरच सध्या जग चालले आहे. हे विषयांतर यासाठी की, १० रुपयांमध्ये भोजन आणि पाच रुपयांमध्ये न्याहारी अशी एक उत्तम योजना कर्नाटक सरकारने जाहीर केली आहे व त्यावर सध्या टीकेचा मारा सुरू आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने कर्नाटक सरकारने मतदारांना भुरळ पाडण्यासाठी हे केले आहे
 
वगैरे वगैरे आक्षेप
 
आता तेथे विरोधक घेत आहेत. आम्ही म्हणतो सरकार कोणाचेही असो, जनहितकारी आणि सामान्य माणसाच्या पोटापाण्याविषयी सुरू केलेल्या योजनांकडे राजकीय द्वेषाने पाहू नये. उलट अशा योजना जास्तीत जास्त सुरू व्हायला हव्यात. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचे राज्य असताना (आजही तसे ते आहे) एक रुपयात पोटभर झुणका-भाकरीची योजना सरकारने सुरू केली होती. त्यामुळे सामान्यांच्या पोटापाण्याची सोय झाली होती, पण तेव्हाच्या काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांना झुणका पचनी पडला नाही. त्यांनी टीकेचा भडिमारच केला. ही योजना राजकीय मतलबासाठी सुरू केल्याचे ठसके त्यांना लागले व महाराष्ट्रात त्यांचे सरकार येताच गरीबांच्या तोंडचा झुणका-भाकरीचा घास त्यांनी काढून घेतला. अशा प्रकरणात आमची न्यायालयेही सारासार विचार न करता निर्णय देतात व गरीबांच्या पोटावर त्यांचा तो हातोडा मारतात. शिवसेनेने झुणका-भाकर देऊन असे काय मोठे पाप केले होते? भुकेचा आणि रोजगाराचाच प्रश्न त्यातून सोडवला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांच्या काळात त्यांनी सहकारसम्राटांना साखर कारखाने व सूतगिरण्या, शिक्षणसम्राटांना शिक्षण संस्था आणि बिल्डरांना भूखंड वाटले. आम्ही झुणका-भाकरीचे वीतभर स्टॉल दिले होते. तरीही नंतर सत्तेत आलेल्या राजकारण्यांना त्याची पोटदुखी झाली. निदान महाराष्ट्रासारख्या राज्यात तरी अशा
 
पोटदुखीचे राजकारण
 
घडू नये. तामीळनाडूत ‘अम्मा कॅण्टीन’ची भुरळही सामान्यांना पडलीच आहे. एक रुपयामध्ये इडली तर पाच रुपयांमध्ये सांबार-भात. ही ‘अम्मा कॅण्टीन’ योजना तामीळनाडूमध्ये माजी मुख्यमंत्री जयललिता यांना पुन्हा सत्ता मिळवून देण्यात यशस्वी ठरली होती. आंध्र प्रदेशातही १९८२ मध्ये तेलगू देशमच्या एन.टी. रामाराव यांनी दोन रुपये किलो दराने तांदूळ देण्याचे आश्वासन दिले व अमलातही आणले. तामीळनाडूतील ‘अम्मा कॅण्टीन’ असो, उत्तर प्रदेशातील योगी सरकारचे तीन रुपयांत नाश्ता आणि पाच रुपयांत जेवण देणारे ‘अन्नपूर्णा भोजनालय’ असो, कर्नाटक सरकारचे सध्याचे १० रुपयांत स्वस्त भोजन असो किंवा महाराष्ट्रात आधीच्या शिवसेना-भाजप सरकारच्या काळातील एक रुपयातील झुणका-भाकर असो, या योजना सामान्य जनतेचे पोट भरणाऱ्या आणि चूल पेटविणाऱया आहेत. गोरगरीबांच्या दृष्टिकोनातून हे बरेच आहे. अशा योजनांना राजकीय विरोध होऊ नयेत. किंबहुना पैसा वाटून, खोटी आश्वासने देऊन, भूलथापा मारून विश्वासघाताने निवडणुका जिंकण्यापेक्षा रोजगार, पोटापाण्याचा प्रश्न सोडवून मते मागणे हे कधीही चांगले. म्हणूनच झुणका-भाकर केंद्राची योजना महाराष्ट्र सरकारने पुन्हा सुरू करावी व ‘वडापाव’ गाडय़ांची योजना राज्यभरात राबवावी अशी शिफारस आम्ही देवेंद्र सरकारकडे करीत आहोत. वाटल्यास श्रेय वगैरे जे काही आहे ते तुम्हीच घ्या. अशा योजनांतूनच महाराष्ट्राला बरकत व गरीबांना रोजगाराची समृद्धी मिळेल!