शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

निकालानंतर ठाकरे गटाचा पुन्हा हिंदुत्वाचा नारा; छत्रपती संभाजीनगरात करणार आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 10:26 IST

 या आंदोलनाला समस्त हिंदू बांधवांनी व शिवसैनिकांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन दानवेंनी केले.

छत्रपती संभाजीनगर - मुख्यमंत्रि‍पदासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली तेव्हापासून विरोधकांकडून सातत्याने ठाकरे गटावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला जात होता. लोकसभा निकालातही अनेक मुस्लिम बहुल भागातून ठाकरे गटाला भरभरून मतदान झालं होते, त्याचाच आधार घेत भाजपासह इतर विरोधकांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केले. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाने पुन्हा हिंदुत्वाचा नारा दिला आहे. बांगलादेशातहिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात ठाकरे गट छत्रपती संभाजीनगर इथं आंदोलन करणार आहे. 

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात हे आंदोलन होणार आहे. याबाबत दानवेंनी ट्विट करून सांगितले की, बांगलादेशमधीलहिंदूंवर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराच्या निषेधार्थ आणि हे अन्याय अत्याचार गप्प राहून बघणाऱ्या मोदी सरकारच्या निषेधार्थ भव्य आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला समस्त हिंदू बांधवांनी व शिवसैनिकांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन त्यांनी केले.

बांगलादेशात काय घडतंय ?

बांगलादेशात इस्कॉनचे मुख्य पुजारी चिन्मय प्रभू यांच्या अटकेनंतर अनेक हिंदू संघटनांशी निगडित लोकांवर कारवाई केली जात आहे. बांगलादेशातून हजारो इस्कॉन सदस्यांना भारतात यायचं आहे परंतु सर्व कागदपत्रे असतानाही सीमेवर बांगलादेशी पोलिसांनी त्यांना रोखले आहे. बांगलादेशातून शेख हसीना यांचे सरकार उलथल्यापासून सातत्याने तेथील अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत. भारतातून पर्यटनासाठी गेलेल्या एका व्यक्तीने त्याला आलेला अनुभव सांगितला. ते एकेठिकाणी गेले असता तिथे जमावाला मी हिंदू असल्याचं कळलं तेव्हा त्यांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. यातून  जीव वाचवून ते पळाले. अनेक हिंदू वस्त्यांवर हल्ल्याच्या घटना येत आहेत. मागील काही काळापासून बांगलादेशात हिंदू मंदिरे तोडली जात आहेत. त्याठिकाणी राहणाऱ्या हिंदू कुटुंबाचा छळ केला जात आहे. मुस्लीम कट्टरतावादी लोकांकडून हिंदूना टार्गेट करण्यात येत आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAmbadas Danweyअंबादास दानवेHinduहिंदूBangladeshबांगलादेश