शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची अवस्था बघून वाईट वाटत पण सांगणार कोणाला, याला उद्धव ठाकरेच जबाबदार- नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 20:21 IST

शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गेलं यांचे जरूर शल्य आहे पण सांगणार कोणाला काही गोष्टी बोलता येत नाही असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेच्या होत असलेल्या पडझडीवर थोडे भावनाविवश झाले.

सावंतवाडी :

शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गेलं यांचे जरूर शल्य आहे पण सांगणार कोणाला काही गोष्टी बोलता येत नाही असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेच्या होत असलेल्या पडझडीवर थोडे भावनाविवश झाले. पण या सगळ्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरत त्यांनी स्वतःच ही राजकीय आत्महत्या केली आहे अशी टिका ही केली.

ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते.यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, संजू परब, संदीप कुडतरकर, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, तालुकाध्यक्ष महेश धुरी, विनोद सावंत, राजू बेग,जावेद खतीब,गुरूनाथ सावंत,रविद्र मडगावकर,मोहिनी मडगावकर,केतनआजगावकर,अमित परब, आनंद नेवगी आदि उपस्थित होते.

राणे म्हणाले, मी शिवसेनेतून त्यावेळी एकटा बाहेर पडलो होतो त्याचा परिणाम शिवसेनेवर नक्कीच झाला माझे  त्यावेळचे बंड आणि आता चाळीस आमदारांनी केलेला बंड यांच्यामध्ये  मोठा फरक आहे आणि विषयही वेगवेगळे आहेत. त्यामुळे शिवसेनेची पडझड होत असल्याचे शल्य जरूर आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात कापणीच्या हंगामामध्ये पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून मी लक्ष देणार आहे. भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची युती करू पण सोयीच्या ठिकाणी करू जिल्हा परिषद, पंचायत समिती , नगरपरिषद सहकार क्षेत्रातील निवडणुकीमध्ये स्थानिक विचाराने ठरवले जाईल. 

मनसेचे अध्यक्ष राजे ठाकरे यांनी अंधेरी पोट निवडणुकीमध्ये भाजपने उमेदवारी मागे घ्यावी आणि रमेश लटके यांच्या पत्नीला पाठिंबा द्यावा असे पत्र दिले आहे मी त्यावर काही बोलणार नाही. असे सांगत विषय टाळला मात्र राणे यांनी शिवसेना नेते  विनायक राऊत, भास्कर जाधव व उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या टिकेचा समाचार घेतला.या तिघांनी पुढ्यात येऊन बोलावे यातील कोणाला रोजगार तरी दिला काय मी अनेकांची घरे बांधून दिली कोणाला उध्वस्त केले नाही जर मी बोलायला लागलो तर हे सर्व जण वाहून जातील, अशी टिका ही राणे यांनी केली.आमदार वैभव नाईक यांनी गौरमार्गाने संपत्ती मिळवली असेल तर त्यांची चौकशी होईल. सरकारला पाठिंबा देण्यासाठी त्यांना यात गुंतवले जाते हा आरोप पूर्ण पणे खोटा असून सरकार पूर्ण बहुमत असताना नाईक यांची सरकारला गरज तरी काय असा सवाल ही मंत्री राणे यांनी उपस्थित केलाआमच्या काळामध्ये अडीचशे कोटीचा नियोजन आराखडा होता पण आता तो 170 कोटी झाला याला जबाबदार कोण असा सवाल करत आता आमचे सरकार आहे त्यामुळेच विकास ही जलद होईल असे सांगितले.तसेच प्रकल्प ही मोठ्याप्रमाणात जिल्ह्यात येतील असे सांगितले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे