शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे हे तर विनोदी नट

By admin | Updated: April 27, 2017 01:36 IST

सत्तेतून वारंवार बाहेर पडण्याची नौटंकी करून उद्धव ठाकरे यांनी ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील कलाकारांनाही मागे टाकले आहे.

सांगली : सत्तेतून वारंवार बाहेर पडण्याची नौटंकी करून उद्धव ठाकरे यांनी ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील कलाकारांनाही मागे टाकले आहे. सत्तेतील विनोदी नट म्हणून त्यांचा परिचय होऊ लागला आहे, अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काढलेली संघर्ष यात्रा सांगलीत पोहोचली. कृष्णाकाठच्या वसंतदादा पाटील स्मारकास अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना विखे यांनी शिवसेनेला टिकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले, सर्वात भ्रष्ट मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यासाठीच ते सरकारमधून बाहेर पडण्यास तयार नाहीत. आपल्या एका सहकाऱ्याचे गैरकृत्य लपविण्यासाठी शिवसेनेचे खासदार लोकसभेत नागरी उड्डाणमंत्र्यांच्या अंगावर धावून जातात. मग शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते असे का धावत नाहीत? अजित पवार म्हणाले की, २५ रुपये मूळ दर असणाऱ्या पेट्रोलवर ५१ रुपयांचा कर सरकारने लावला आहे. महामार्गावरील दारूबंदीच्या माध्यमातून होणारी तूट भरून काढण्यासाठी हा उद्योग करण्यात आला आहे. दारूड्यांचा कर दुष्काळाच्या नावावर दारू न पिणाऱ्या लोकांकडून वसूल करतानाही या सरकारला लाज वाटत नाही. (प्रतिनिधी)कृषी व पणनमंत्र्यांनी राजीनामा द्यावा...तूरडाळ उत्पादक शेतकऱ्यांना सरकारी धोरणाने संकटात आणले असताना केवळ २२ एप्रिलपर्यंत टोकन घेणाऱ्या शेतकऱ्यांचीच तूरडाळ खरेदी करण्याचे धोरण मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यांची ही उपकाराचीच भाषा आहे. ज्यांचा पेरा उशिरा आहे अशा उत्पादकांनी काय करायचे, असा सवाल अजित पवार यांनी केला. तूरडाळीच्या प्रश्नावर मार्ग काढण्यात अपयशी ठरलेल्या राज्याच्या कृषी व पणनमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पवार व विखे-पाटील यांनी केली. स्वाभिमानी शब्द वगळा!स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी आता शेतकऱ्यांचे नेते राहिलेले नाहीत. शेतकरी अडचणीत असताना दोन्ही नेते तोंडाला पट्ट्या बांधून गप्प आहेत. याशिवाय त्यांच्या संघटनेला आता स्वाभिमानी हा शब्दही शोभत नाही, अशी टीकाही या नेत्यांनी केली.