शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
5
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
6
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
7
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
8
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
9
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
10
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
11
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
12
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!
13
हृदयस्पर्शी! शाळेच्या लाडक्या दास काकांची ३८ वर्षांची सेवा, वाजवली शेवटची घंटा; पाणावले डोळे
14
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
15
दिवाळीनिमित्त मराठी अभिनेत्रीने पोस्ट केला लेकाचा गोड फोटो; म्हणाली, "माझ्या छोट्या स्टारची..."
16
WhatsApp युजर्सना मोठा धक्का; ChatGPT चा वापर करू देणार नाही मेटा, कारण...
17
"मोठी सती सावित्री बनून फिरतेय, रीलमध्ये फक्त पेटीकोटवर...", तान्या मित्तलची मालतीकडून पोलखोल
18
"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक
19
"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
20
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...

विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 09:52 IST

विधानसभेच्या गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीत जागावाटपात आणि उमेदवारांची निवड करण्यातही विलंब झाला, असे मत उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

मुंबई : विधानसभेच्या गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीत जागावाटपात आणि उमेदवारांची निवड करण्यातही विलंब झाला, असे मत उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. अशाच चुकांची पुनरावृत्ती झाली तर मग महाविकास आघाडीचे औचित्य काय उरेल, असा प्रश्नही त्यांनी केला. 

उद्धवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मविआने जोरदार यश मिळविले होते, त्यावेळी असलेला उत्साह हा मोठ्या यशामुळे व्यक्तिगत अहंकारात बदलला, ज्यामुळे विधानसभा निवडणुकीत मविआचा पराभव झाला.

तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये घोषणा करण्याची स्पर्धा आमच्या पक्षाने ज्या जागा अनेकदा जिंकलेल्या होत्या त्यापैकी काही जागा या आम्हाला लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांना द्याव्या लागल्या. विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचा घोळ शेवटपर्यंत चालला, ज्यामुळे जनतेत मविआबद्दल चुकीचा संदेश गेला. अशा चुकांची पुनरावृत्ती होता कामा नये, तरीही तसे घडले तर सोबत राहण्याचा काहीच अर्थ उरणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मविआतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जनतेसाठी घोषणा करण्याची स्पर्धा लागली होती, त्यामुळेही नुकसान झाले. 

ईव्हीएम घोटाळा, बनावट मतदार याद्या, मतदारांची अचानक वाढलेली संख्या हे विषय चर्चेत आहेतच. लाडकी बहीण सारखी भ्रामक योजना आणली गेली, त्याचाही आम्हाला फटका बसला पण चुका कबूल न करण्यातही अर्थ नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीElectionनिवडणूक 2024Mumbaiमुंबई