शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे टनेल प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची हमी द्या, उद्धव सेनेची एमएमआरडीएकडे मागणी

By मनोहर कुंभेजकर | Updated: June 4, 2025 18:35 IST

एमएमआरडीएच्या बोरिवली - ठाणे ट्विन टनेल प्रकल्पाच्या परिसरातील काही एसआरए प्रकल्प वर्षानुवर्षे रखडलेले आहेत.

मनोहर कुंभेजकर, मुंबई: एमएमआरडीएच्या बोरिवली - ठाणे ट्विन टनेल प्रकल्पाच्या परिसरातील काही एसआरए प्रकल्प वर्षानुवर्षे रखडलेले आहेत. मागाठाणे येथील या झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनासाठी आता काही विकासक पुढे आले आहेत. मात्र, हे प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन रहिवाशांना हक्काची घर देण्याची हमी एमएमआरडीएने द्यावी, अशी मागणी उद्धव सेनेने काल सायंकाळी एमएमआरडीए आयुक्तांकडे केली.

एमएमआरडीएकडून बोरिवली - ठाणे ट्विन टनेल प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे मागाठाणे येथील रुपवते नगर, फरलेवाडी - त्रिमूर्ती देवीपाडा आणि ९० फूट रोडवरील ५७२ रहिवाशी बाधित होणार आहे. या प्रकल्पाच्या काही भागात त्रिमूर्ती देवीपाडा सोसायटी, महाकाली एसआरए सोसायटी  , देवीपाडा एसआरए सोसायटी असे तीन एसआरए प्रकल्प ४ ते ७ वर्षांपासून विकासकांकडून रखडलेले आहेत. विकासकांनी या रहिवाशांचे कोट्यवधी रुपयांचे भाडे देखील थकवले आहे. यातील महाकाली एसआरए प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एका भाजप नेत्याच्या कंपनीने प्रस्ताव दिला आहे. आधीचा अनुभव पाहता रहिवाशांचा एसआरए आणि विकासकांवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे वेळेत घर आणि भाडे मिळवून देण्याची हमी एमएमआरडीएने द्यावी, अशी येथील प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. 

या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उद्धव सेनेचे उपनेते डॉ.विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली काल सायंकाळी एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी उद्धव सेनेच्या मागणीला संजय मुखर्जी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. एमएमआरडीएकडे उपलब्ध असलेल्या पीएपी घरांची माहिती देऊन कायमस्वरूपी देण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली. 

या बैठकीला माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभागसंघटक शुभदा शिंदे, विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, वैभवी तावडे, हनुमंत मोरे, अभिलाष कोंडविलकर, सचिन मोरे, माधुरी खानविलकर, तुकाराम पालव, नंदकुमार मोरे, रोहिणी चौगुले यांच्यासह या प्रकल्पामुळे बाधित झालेले रहिवाशी उपस्थित होते.

ट्विन टनेल प्रकल्पाला येथील रहिवाशांचा विरोध नाही. रहिवाश्यांना वेळेत घरे किंवा भाडे मिळवून देण्याची हमी एमएमआरडीएने द्यावी अशी उद्धव सेनेची मागणी आहे. त्याला एमएमआरडीएकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तसेच एमएमआरडीए प्रकल्पग्रस्तांपैकी ज्यांना घराऐवजी रकमेचा पर्याय हवा आहे अशा रहिवाशांसाठी खास कॅम्पेन आयोजित करून त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, ही आमची मागणी देखील मान्य करण्यात आली. यासंदर्भात एसआरएची भूमिका जाणून घेण्यासाठी आम्ही लवकरच एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत, अशी माहिती शिवसेना उबाठा गटाचे उपनेते डॉ.विनोद घोसाळकर यांनी दिली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र