शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
2
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
3
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
4
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
5
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
6
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
7
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
8
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
9
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
10
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
11
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
12
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
13
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
14
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
15
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
16
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
17
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
18
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
19
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?

उद्धव-राज भेटीच्या बातम्यांवर सेनेचा संताप

By admin | Updated: July 31, 2016 04:46 IST

उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोघा बंधुंमधील शुक्रवारच्या भेटीविषयी आलेल्या बातम्यांवर शनिवारी शिवसेनेने संताप व्यक्त केला

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोघा बंधुंमधील शुक्रवारच्या भेटीविषयी आलेल्या बातम्यांवर शनिवारी शिवसेनेने संताप व्यक्त केला. दोघा भावांनी बंदद्वार चर्चा एकांतात नाही करायची, तर काय शिवाजी पार्कात करायची? असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी केला आहे. या दोघांच्या भेटीत राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले होते. राऊत यांनी या बाबीचा इन्कार केला आहे. उद्धव यांचे बंधू जयदेव यांनी संपत्तीच्या वादावर केलेल्या आरोपांसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याचेही राऊत यांनी नाकारले. ‘संपत्तीच्या वादाचे प्रकरण हाताळण्यासाठी उद्धव ठाकरे सक्षम आहेत,’ अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. राऊत यांनी म्हटले आहे की, ‘दोघा भावांची भेट ही कौटुंबिक स्वरूपाची होती. राहुल गांधी आणि वरुण गांधी हे दिल्लीत रोज भेटतात, म्हणून काय रोज वातावरण ढवळून काढायचे का? राज ठाकरे मातोश्रीवर गेले. उद्धव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आदरातिथ्य करण्याची मातोश्रीची परंपरा आहे आणि राज तर घरातलेच आहेत.’ ‘महापालिका निवडणुकीच्या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुखांची ‘मन की बात’ लवकरच समोर येईल. निवडणूक फार लांब नाही. शिवसेनेच्या मोठ्या विजयासाठी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना आहेत. राज-उद्धव हे भाऊ आहेत. भाऊ किंवा दोन नेते भेटतात, तेव्हा चर्चा ही बंद खोलीतच होते. उद्धव हे राज यांचे मोठे भाऊ असून, कुटुंबाचे कर्ते आहेत,’ असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)>सेना-मनसे युतीबाबत इन्कार मात्र नाहीशिवसेना आणि मनसे आगामी महापालिका निवडणुकीत एकत्र येणार असल्याचा कोणताही इन्कार राऊत यांनी केला नाही. उलट, उद्धव ठाकरे हे ‘मन की बात’ लवकरच सांगतील, असे म्हणत ‘सस्पेन्स’ कायम ठेवला आहे.