शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजे-रामराजे मैत्री पर्वाची नांदी!, अबोला संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 19:04 IST

Politics, Udayanraje Bhosale, Ramaraje Nimbalkar, phaltan, Satara area काही काळापूर्वी एकाच पक्षात असताना एकमेकांवर टोकाची टीका करणारे खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्यामध्ये समेट घडून आल्याचे चित्र शनिवारी पहायला मिळाले. साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर हे दोन्ही नेते एकमेकांशी हास्यविनोद करत गप्पा मारताना पाहायला मिळाले.

ठळक मुद्दे उदयनराजे-रामराजे मैत्री पर्वाची नांदी!, अबोला संपला कोरोनापासून बचावासाठी एकमेकांना सल्ले

सातारा : काही काळापूर्वी एकाच पक्षात असताना एकमेकांवर टोकाची टीका करणारे खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्यामध्ये समेट घडून आल्याचे चित्र शनिवारी पहायला मिळाले. साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर हे दोन्ही नेते एकमेकांशी हास्यविनोद करत गप्पा मारताना पाहायला मिळाले.हे दोन्ही नेते एकमेकांवर अनेक वर्षांपासून खार खाऊन आहेत. खासदार शरद पवार यांनी अनेकदा उदयनराजेंच्या बाजूने दिलेला कौल रामराजेंना पसंत पडला नव्हता. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक असो अथवा लोकसभेचे उमेदवारी यावरून रामराजे यांचा उदयनराजेंना कायमच विरोध पाहायला मिळाला.

फलटणच्याराजकारणामध्ये रामराजे यांचे कट्टर विरोधक असलेले खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्याशी असलेली उदयनराजेंची मैत्री तर सर्वश्रुतच आहे. रणजीतसिंह यांच्या मैत्रीखातर फलटणमध्ये जाऊन रामराजेंना आव्हान देण्याचे काम अनेकदा उदयनराजेंनी केलेले आहे तर आज ज्या ठिकाणी या दोन्ही नेत्यांची बैठक झाली, त्या ठिकाणाहून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दोन्ही नेते एकमेकांवर शेलक्या भाषेत टीका करत होते.लोकसभेच्या पोटनिवडणुकीत देखील रामराजेंनी उदयनराजेंवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. जिल्हा परिषदेच्या मैदानावर झालेल्या भर पावसातील सभेत देखील रामराजेंनी आपल्या मनातील भावना व्यक्त केली होती. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव झाला. आता उदयनराजे भाजपमध्ये आहेत तर रामराजे राष्ट्रवादीतच! मात्र एका पक्षात असताना मांडीला मांडी लावून न बसणारे हे दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षात असून देखील हास्यविनोदात गुंतलेले पहायला मिळाले.शनिवारी दुपारी रामराजे शासकीय विश्रामगृहावर एका कक्षात बसलेले होते. त्याच वेळी उदयनराजे देखील आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्याला भेटण्यासाठी विश्रामगृहावर आले. रामराजे देखील विश्रामगृहावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते थेट रामराजे यांना भेटायला गेले. या ठिकाणी दोघांनी दिलखुलास गप्पा देखील झाडल्या. कोरोना पासून काळजी घेण्याबाबतचा दोघांनी एकमेकांना सल्ला दिला.दरम्यान, या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दोघांनाही एकमेकांना भेटायचे होते, याच उद्देशाने ठरवून हे दोन्ही नेते एकत्र आल्याची चर्चा सुरू झाली आहे. हीच भेट उदयनराजे रामराजे यांच्या मैत्री परवाची नांदी ठरते की काय? असा तर्कदेखील राजकीय वर्तुळातून काढला जात आहे.उदयनराजेंच्या गालावर खळीदार हास्य... रामराजेंचे मात्र मास्कराम राजे उदयनराजे एकमेकांशी गप्पा मारत असताना उदयनराजेंच्या गालावर खळीदार हास्य फुलले होते तर रामराजे यांच्या तोंडावर मास्क पाहायला मिळाले. मात्र गप्पा मारताना त्यांनी आपले मास्क उतरून ठेवले. 

टॅग्स :PoliticsराजकारणUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेRamaraje Nimbalkarरामराजे निंबाळकरphaltan-acफलटणSatara areaसातारा परिसर