शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

सारस्वतांच्या स्वागतासाठी उदयगिरीचा मुलुख सज्ज! अजय-अतुलच्या कार्यक्रमाने वातावरणनिर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 08:29 IST

या संमेलनाची धुरा महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाने आपल्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त पेलली आहे. महाविद्यालयाच्या ३६ एकरांत व्यासपीठांसह विविध दालने उभारण्यात आली आहेत.

व्ही. एस. कुलकर्णी -

उदगीर (जि. लातूर) : ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी येणाऱ्या सारस्वतांच्या स्वागतासाठी मराठवाडा, महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक, तेलंगणाचा सीमाप्रांतही सज्ज झाला आहे. बुधवारच्या अजय-अतुलच्या संगीत रजनीमुळे संमेलनाची वातावरण निर्मिती झाली आहे. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरीत होणाऱ्या संमेलनाच्या स्वागतांच्या कमानी ठिकठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. 

या संमेलनाची धुरा महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाने आपल्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त पेलली आहे. महाविद्यालयाच्या ३६ एकरांत व्यासपीठांसह विविध दालने उभारण्यात आली आहेत. मुख्य मंडपाला छत्रपती शाहू महाराज सभागृह असे नाव आहे. येथील व्यासपीठाला उदयगिरी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य डॉ. ना. य. डोळे व्यासपीठ म्हणून संबोधण्यात येणार आहे.

परिसंवादाचे दालन लोकनेते विलासराव देशमुख सभागृह आहे. याशिवाय, शांता शेळके कविकट्टा हा देवीसिंह चौहान सभागृहात, तर सुरेश भट गझलकट्टा हा सिकंदर अली वज्द सभागृहात रंगणार आहे. ग्रंथ प्रकाशनाची तीन स्वतंत्र दालने, चित्र-शिल्प कलादालन, अभिजात मराठी दालन, बालमेळाव्याचे स्वतंत्र दालन असे आहेत. साहित्यनगरीचे प्रवेशद्वार उदगीर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या प्रतिकृतीने स्वागताला सुसज्ज झाले आहे. 

शब्दोत्सवाचा आनंद घ्यावा संमेलनासाठी तीन महिन्यांपासून अनेकांचे हात परिश्रम घेत आहेत. रसिकांनी संमेलनाला उपस्थित राहून शब्दोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे, कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, मुख्य कार्यवाह रामचंद्र तिरुके, कोषाध्यक्ष प्रा. मनोहर पटवारी, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी केले आहे.

तीन प्रांतांना जोडणारी ग्रंथदिंडी - यंदाची ग्रंथदिंडी तीन वैशिष्ट्यांच्या पालखीतून मिरवणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या सीमांना एकसंध करणाऱ्या या ग्रंथदिंडीचे नेतृत्व महिलांचे पथक करणार आहे. 

- दुसरे वैशिष्ट्य ‘गुगलविधी’. कर्नाटकातील गुगल नृत्य प्रकारानुसार विवाहापूर्वी वाजतगाजत, नृत्य करीत देवतेची पूजा करण्याचा हा विधी अनुभवायला मिळणार आहे. - मराठी भाषेच्या नवरसांची समृद्धी दर्शविणारी नवरंगदिंडी तिसरे वैशिष्ट्य. यात ५०० शालेय विद्यार्थी नऊ रंगांच्या टोप्यांसह सहभागी होणार आहेत.  

 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनlaturलातूर