शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांनंतर सात आरोपी निष्पन्न

By admin | Updated: October 31, 2016 01:38 IST

स्थानिक गुन्हेगारांच्या वर्चस्ववादातून भोसरीत २०१४ मध्ये अक्षय काटे याचा खून झाला

पिंपरी : स्थानिक गुन्हेगारांच्या वर्चस्ववादातून भोसरीत २०१४ मध्ये अक्षय काटे याचा खून झाला होता. हा खून ज्या टोळीने केला, त्या टोळीत विकास माळी याचाही सहभाग होता. अक्षयच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शनिवारी भोसरी गव्हाणेवस्ती येथे विकासचा खून झाल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले असून, विकासच्या खुनातील आरोपी निष्पन्न झाले आहेत. प्रमुख सूत्रधार मल्लेश कोळी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भोसरीत अक्षय काटे याचा खून झाला. या खुनातील आरोपींमध्ये आरोपी विकासचा सहभाग होता. अल्पवयीन असल्याने त्याला सुधारगृहात पाठवले होते. काही महिन्यांपूर्वीच तो सुधारगृहातून बाहेर आला होता. अक्षयच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने विकासला धारदार शस्त्राचे वार करून संपविण्यात आले. नुकत्याच झालेल्या या खून प्रकरणात मल्लेश कोळी, शांताराम वाघमारे, शिवमप्रसाद, प्रशांत, अनिकेत ऊर्फ अंड्या, श्रीकांत या आरोपींचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. हे सर्व आरोपी भोसरीत राहणारे आहेत. त्यातील आणखी एक आरोपी ज्ञानेश्वर लांडगे हा येरवडा तुरुंगात आहे. विकास माळीचे अक्षय काटेच्या खून प्रकरणानंतर वर्चस्व वाढले आहे. (प्रतिनिधी)>गुन्हेगारी वर्चस्व वाढल्यास आपल्या टोळीला जड जाऊ शकते. हे लक्षात घेऊन विकासच्या विरोधातील टोळीने त्याला संपविण्याचा निर्णय घेतला. ज्ञानेश्वर लांडगे तुरुंगातून बाहेर येण्यापूर्वीच त्याच्या या टोळीने विकासचा गेम केला. खुनाचा बदला खून अशा स्वरूपाची ही भोसरीत घडलेली घटना आहे. भोसरीत स्थानिक गुंडांमध्ये वर्चस्ववाद असल्याचे या घटनेच्या माध्यमातून पुढे आले आहे. महापालिका निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशातच घडलेल्या या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.