शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

तीन महिन्यांत दोन हजार झोपड्या जमीनदोस्त

By admin | Updated: July 14, 2017 03:04 IST

अनधिकृत झोपड्यांविरोधात महानगरपालिकेने धडक कारवाई मोहीम हाती घेतली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : अनधिकृत झोपड्यांविरोधात महानगरपालिकेने धडक कारवाई मोहीम हाती घेतली असून, एप्रिल महिन्यापासून जवळपास दोन हजार अनधिकृत झोपड्या हटविण्यात आल्या आहे. अतिक्रमण विभागाच्या धडक कारवाईतंर्गत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या २१,४२७ फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत झोपड्यांमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण होते. शहरातील स्वच्छता, सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने विविध मोहीम राबविल्या जात आहेत. शहराला अतिक्रमणमुक्त करण्यासाठी धडक कारवाई केली जात असल्याचे दिसून येते. अतिक्रमण विरोधी मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश आयुक्त डॉ. रामस्वामी एन. यांनी दिले आहेत. त्यानुसार सर्वच विभागात धडक कारवाई करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये ९४० झोपड्यांवर कारवाई करण्यात आली असून मे महिन्यात १२१५ झोपड्या, जूनमध्ये ५८ झोपड्या अनधिकृत झोपड्या निष्कासित केल्या आहेत. अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली असून एप्रिल महिन्यामध्ये ८ हजार ५२२ फेरीवाले, मे महिन्यात ६ हजार ९१६ आणि जूनमध्ये ५हजार ९८९ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच बेलापूरमधील १०८, तुर्भे येथील ५१२, कोपरखैरणेतील ३३२, घणसोलीतील १०८ आणि दिघ्यातील ७४ अशा एकूण १ हजार १३७ अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. गेल्या दहा दिवसांमध्ये अनधिकृतरीत्या उभारलेल्या ८० होर्डिंग्ज आणि बॅनर्सवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांत अतिक्रमण विभागाच्या कारवाईतंर्गत ६० हजार रुपये दंडात्मक वसुली करण्यात आली आहे. परिमंडळ २ चे उपायुक्त डॉ. अमरीश पटनिगीरे यांच्या नियंत्रणाखाली अतिक्रमण विरोधी मोहीम राबविली जात आहे.