शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार पुनर्वसित आदिवासी मेळघाटात धडकले, मुलाबाळांसह परतले मूळगावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 19:52 IST

पाच वर्षांपूर्वी तालुक्यांतून पुनर्वसित झालेले आठ गावांमधील दोन हजारांवर आदिवासी शनिवारी दुपारी ३ वाजता मुलाबाळांसह मूळगावी परतले.

चिखलदरा, दि. 9 -  पाच वर्षांपूर्वी तालुक्यांतून पुनर्वसित झालेले आठ गावांमधील दोन हजारांवर आदिवासी शनिवारी दुपारी ३ वाजता मुलाबाळांसह मूळगावी परतले. संबंधित अधिका-यांसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने व कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त आदिवासींनी शेकडो पोलीस, कमांडो आणि वनकर्मचा-यांचा ताफा भेदत कूच केले. 

तालुक्यातील सोमठाणा खुर्द, अमोना नागरतास, गुल्लरघाट, केलपाणी, धारगढ व बारूखेडा येथील आदिवासींचे व्याघ्र प्रकल्पाच्या अतीसंरक्षित क्षेत्रातून सन २०११ ते २०१५ मध्ये टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्यात आले होते. पुनर्वसित वस्ती सोयी-सुविधांचा प्रचंड अभाव असल्याने शिवाय वैद्यकीय सुविधादेखील न मिळाल्याने तब्बल २२८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे भयावह आकडे आहेत. आदिवासींच्या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे संतप्त आदिवासींनी ९ सप्टेंबर रोजी मूळ गावी परतण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शनिवारी त्यांनी मूळ गावांकडे धाव घेतली. 

पोपटखेडा-खटकाली गेटवर या आदिवासींना अडवून माजी आमदार राजकुमार पटेल, प्रकाश घाडगे, प्रवीण तेलगोटे, विकास खंडेझोड, रवि जावरकर, बाबूलाल बेठेकर आदींसह अकोटचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, उपवनसंरक्षक विशाल माळी आदींनी आदिवासींचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश आले. खटकाली नाक्याचे कुलूप फोडल्यानंतर आदिवासी विरूद्ध प्रशासन असा संघर्ष उदभवण्याची चिन्हे होती. मात्र, प्रशासनाने मवाळ भूमिका घेतल्याने ती स्थिती टळली. 

दुपारी ३ वाजता तोडले गेटचे कुलूप आदिवासींनी मेळघाटात परतण्याचा इशारा दिल्याने शनिवारी व्याघ्र प्रकल्पात अलर्ट जारी करण्यात आला होता. खटकाली, झरी, तलई, अमोना, ढाकणा हे सर्व गेट सील करण्यात आले होते. व्याघ्र प्रकल्पाचे अतीजलद दल, कमांडो, पोलीस, वनकर्मचाºयांचा मोठा ताफा तैनात होता. तरीही हा चक्रव्यूह भेदून आदिवासी महिलांनी गेटचे कुलूप फोडून दुपारी ३ वाजता आत प्रवेश केला. सोमवारी बैठकीचा प्रयत्न मूळगावी परतलेल्या हजारो आदिवासींना परत पुनर्वसित गावांमध्ये आणून व त्यांची समजूत काढून सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे सुरू आहे. सोमवारी यासंदर्भात बैठक बोलविण्याबाबत अकोटचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांनी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्याशी चर्चा केली. 

पुनर्वसितांच्या या आक्रोशासाठी प्रशासनच जबाबदार आहे. आता आदिवासींचे मन वळविण्यासाठी सोमवारी बैठक बोलविली आहे. त्यात तोडगा काढू.- राजकुमार पटेल, माजी आमदार, मेळघाट

वरिष्ठांसोबत चर्चा करून पुनर्वसित आदिवासींच्या सर्व समस्या निकाली काढण्याबाबत बैठक बोलविण्यात येईल. - उदय राजपूत, उपविभागीय अधिकारी, अकोट

व्याघ्र प्रकल्पांत विनापरवाना शिरणाºयांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यांना यापूर्वीसुद्धा सूचना दिल्या आहेत.- सुनील शर्मा, उपवनसंरक्षक, अकोट वन्यजीव विभाग